शिक्षक आघाडीचे रविंद्र सोळंके यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते सहभागी…
शासनांनी कर्मचाऱ्यांना हलक्यात घेवू नये-रविंद्र सोळंके…
अमरावती – आज झालेल्या अमरावती मधिल आंदोलनामधे अमरावती जिल्हातील किमान 17 ते 18 हजार कर्मचारी यांनी आपला सहभाग नोंदवून शासनाची झोप उडवली असल्याची खळबळ जनक टिका शिक्षक आघाडीचे प्रसिद्धी प्रमुख रविंद्र सोळंके यांनी केली आहे.
राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेव्दारा आयोजीत 14 मार्च पासून पुकारलेल्या बेमुदत संपाला अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा,यवतमाळ व वाशीम या या पाचही जिल्ज्हामधे माजी शिक्षक आमदार प्रा.श्रीकांत देशपांडे यांच्या शिक्षक आघाडी संघटनेने सक्रीय सहभाग नोंदवून आपला पाठींबा दर्शविला आहे…
या संपामुळे अमरावती विभागातील पाचही जिल्यातील 5 महानगर व 56 तालुक्यामधे सर्व 6 जिल्हा अध्यक्ष,56 तालुका अध्यक्ष व इतरही विभागाय , जिल्हा, तालुका व इतरही कर्मचारी यांनी आप आपल्या स्थानिक पातळीवरील शासकीय, निमशासकीय, शाळा महाविद्यालय, आरोग्य केंद्र,तहसिल कार्यालय, जिल्हा परिषद शाळा,
पंचायत समिती, सा. बा. वि. कृषी भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक,जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय , महानगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत व इतरही कार्यालये जवळ पास 100 टक्के बंद ठेवण्यात आली होती परंतू आज प्रत्यक्ष सर्वांनी सहभाग नोंदविला आहे.
नविन पेशंन योजना बंद करुन जुनी पेशंन योजना तात्काळ चालू करण्यात यावी या मागणीसाठी राज्यव्यापी संपाची हाक जुन्या पेशंन योजना संघटनेने दिल्या नंतर अमरावती शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार प्रा श्रीकांत देशपांडे यांनी आपल्या शिक्षक संघटनेचा पत्र देवून पाठींबा देवून सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांना उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले होते.
यावर अमरावती मधे विभागीय अध्यक्ष विलास राऊत, विभागीय प्रसिद्धी प्रमुख रवींद्र मनकर्णाबाई रामकृष्ण सोळंके,कास्ट्राईब अध्यक्ष नाशिक भगत,महिला प्रमुख निता गहरवाल,जिल्हा अध्यक्ष निलेश देशमुख,कार्याध्यक्ष निलेश पारडे, तालुका अध्यक्ष हर्षवर्धन बोके,सुनिल जिवतोडे,अमोल तट्टे,मनोज देशमुख, अनिल जिवतोडे,संजय ठाकरे, सुभाष पवार, अमोल महात्मे,विजय झुडपे,नांदुरकर धारणी,आशिष विधाते, संजय मालधुरे,सुधाकर खडसे,
अजय देशपांडे,राजेश सोळंके, महादेव बिचुकले,विजय यावले,नरेश खानंदे, रोशन खानंदे, निलेश मातकर,प्रशांत धुर्वे, विजेंद्र मोरकर,अनुप बोराडे,मनीष वाळके, सचिन रवाळे, निलेश घुणारे, विनीत ढोले,गजानन जाधव,प्रशांत पडोळे, जिरापुरे,सुनिल चव्हाण,ज्ञानेश्वर तेंडुलकर, दीपक अंबरते,संजय जीरापुरे, विलास बेठेकर, प्रविण राठोड, मनोज सोळंके,रवि पवार,रामदास गायकवाड, लता निरटकर,गणेश आडे, सुधीर खानंदे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख रविंद्र सोळंके यांनी दिली.
आजचा अमरावती मधील मोर्चा हा शासनाची झोप उडवीनारा आहे.शासनांनी कर्मचाऱ्यांना हलक्यात घेवू नये.गेल्या विधान परिषदे सारखाच कदाचित त्यापेक्षाही खराब निकाल हा 2024 च्या विधानसभा व लोकसभेचा लागणार.संपावरील कर्मचारी शासनाच्या दबावाखाली येणारा नाही. पेशंन भेटेपर्यंत संप सुरुच राहील – रविंद्र सोळंके प्रसिद्धी प्रमुख शिक्षक आघाडी