Friday, January 3, 2025
Homeराज्यग्रामपंचाय खैरी बिजेवाडा कडून शिक्षकांचा सत्कार...

ग्रामपंचाय खैरी बिजेवाडा कडून शिक्षकांचा सत्कार…

रामटेक – राजु कापसे

भारताचे पहिले माजी उपराष्ट्रपती तथा दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबर 2024 रोजी शिक्षक दिना निमित्त ग्रामपंचायत खैरी बिजेवाडा येथे पहिल्यांदाच सरपंच मा.रणवीर सोहनलाल यादव तसेच सचिव मा.अनिल आगरकर आणि ग्रामपंचायत सदस्य सौ.कल्पना ताई मस्के,सौ.सुलोचनाताई सलामे,अश्विन नदेश्वर,

अजय कठोते,सौ.संघमित्रा अंबादे,सौ. लक्ष्मी ताई खोब्रागडे,सौ. मीनाताई खोब्रागडे, सर्व टीम तर्फे शॉल श्रीफळ देवून ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिजेवाडा, मनसर माईन, चारगाव या शाळेतील शिक्षक व शिक्षिका तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे सत्कार करण्यात आले.

यावेळी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत तर्फे ड्रेस शूज सॉक्स वाटप करण्यात आले. हा पहिल्यांदाच कार्यक्रम घेतल्याबद्दल सर्व समाज, गावकरी व शिक्षक वर्ग कडून सरपंच साहेबांचे कौतुक होत आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: