Sunday, December 22, 2024
Homeराज्यअर्चना विद्यालय लाखपुरी येथे शिक्षक दिन साजरा...

अर्चना विद्यालय लाखपुरी येथे शिक्षक दिन साजरा…

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन , डॉ. ज.गो. चव्हाण यांचा जन्म दिन , स्व . उरा गिरी यांचा स्मृती दिन मोठ्या उत्साहात साजरा…

अतुल नवघरे

लाखपुरी ०६ , मुर्तिजापूर तालुक्यातील मानांकित प्रसिद्ध अर्चना विद्यालय, लाखपुरी येथे शिक्षक दिन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिन साजरा करण्यात आला. यावेळेस विद्यालयाच्या मार्फत गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.हि प्रभात फेरी प्रसिद्ध कवी स्व.श्री. उ. रा .गिरी यांच्या समाधी स्थळा पर्यंत नेण्यात आली व समाधी चे व त्यांच्या फोटोचे मुख्याध्यापकांच्या हस्ते हार व पुष्प वाहून पूजन करण्यात आले .आणि सर्व शिक्षकांनी सुध्दा उ. रा. गिरींच्या प्रतिमेचे पूजन केले.

यावेळी विद्यालयातील शिक्षक श्री. एस.पी. हरसुले यांनी या प्रसंगी ” मी एकटा निघालो ” या कवितेचे वाचन केले. व विद्यार्थी यांनी घोषवाक्य म्हटली ” जब तक सुरज चांद रहेगा ! उ . रा .गिरी का नाम रहेगा.” ! उ. रा . गिरी . अमर रहे ! यानंतर विद्यालयात स्वयंम शासनाचा कार्यक्रम घेण्यात आले.काही विद्यार्थ्यांनी शिक्षक शिक्षिकांची भूमिका घेऊन विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम केले.

त्यामधे मुख्याध्यापिकेच्या भूमिकेत वर्ग बारावीची विद्यार्थी कु. कोमल नांदुरकर तर शिक्षिका कु. भक्ती बावणे , कु. शुभांगी जामनिक, रेश्मा जोगी ,कु.वाकोडे. त्याच प्रमाणे शिक्षकांन मधे वर्ग दहावी चे विद्यार्थी सुशांत सुर्यवंशी , उज्वल दिलीप जामनिक, यश भोजने व रोहीत थोरात हे होते.

तर शाळेतील शिपाई चे कार्य वर्ग सातवीचा विद्यार्थी अनुकल शिवपाल गुजर याने पाहीले. त्यानंर बक्षिस समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांची भाषणे झाली कु .जाहन्वी राऊत हिने शिक्षकांन विषयी खूप चांगल्या प्रकारे विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस.डी. चव्हाण सर होते. अध्यक्षांनी उ . रा. गिरी यांच्या प्रतिमेचे केले व अतुल नवघरे डॉ. ज. गो .चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन केले.तसेच अ .शे देशमुख यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून ग्रामिण पत्रकार संघ मुर्तिजापुर तालुका अध्यक्ष पत्रकार श्री. अतुल नवघरे हे होते. अतुल नवघरे यांनी आपल्या भाषणा मधून विचार व्यक्त केले ते म्हणाले की शिक्षक हा ईश्वरा पेक्षा मोठा असतो.आपल्या आई वडीलांन नंतर खरे मार्गदर्शक कोण असतील तर ते म्हणजे शिक्षक होय.कारण ते आपल्या भविष्याची जडणघडण करीत असतात आणि पालकांना त्यांच्या मुलांना याच विद्यालयात शिकवण्याचा आग्रह केला व महती सांगितली.अध्यक्षांनी आपल्या भाषणात यांनी संस्थेचे अध्यक्ष डॉ. ज. गो.चव्हाण यांच्या बोलतांना म्हटले की आपल्या गावामधे ज्ञानाची गंगा कोणी आणली असेल तर संस्थेचे अध्यक्ष डॉ. ज.गो. चव्हाण यांनी आणली.

त्यांचा जन्म ०५ सप्टेंबर १९४० रोजी लाखपुरी गावी झाला.या शाळेतील बरेच विद्यार्थी उच्च पदावर विराजमान आहेत. कोणी न्यायाधिश ,डॉक्टर, शिक्षक, वकील, आणि इंजिनिअर आहेत. तर अ .शे.देशमुख व वर्ग शिक्षक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना भेट वस्तु देऊन त्याचे अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सौ. भुतडा मॅडम व सौ. सोळंके मॅडम यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मनिषा वाकोडे ने केले तर आभार प्रदर्शन कु कोमल नांदुरकर हिने केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: