श्रीराम विद्यालयातील वार्षीकोत्सव प्रसंगी महामेट्रो चे अभियंता दिपक भोले यांचे उद्गार…
सारस्वत विघार्थी मंडळाचा वार्षिकोत्सव थाटात साजरा
रामटेक – राजू कापसे
रामटेक येथिल शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत असलेल्या श्रीराम शिक्षण संस्था अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांचा सारस्वत विद्यार्थी मंडळ, रामटेक वार्षिकोत्सव कार्यक्रम नुकताच मोठ्या थाटात पार पडला. दिनांक २६ ऑगस्टला ताई गोळवलकर विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित वार्षिकोत्सवाला प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर लक्ष्मणराव गाडगे तर अध्यक्षस्थानी महामेट्रो नागपूरचे अभियंता तथा श्रीराम विद्यालय रामटेकचे माजी विद्यार्थी दीपक विजयकुमार भोले, आमदार आशिष जयस्वाल उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना हितोपदेश देतांना याच शाळेचे १९९७ च्या बॅचचे माजी विद्यार्थी तथा नागपुर महामेट्रो येथील अभियंता दिपक भोले यांनी उपस्थीत विद्यार्थ्यांना हितोपदेश देतांना ‘ माझ्या प्रगतीमागे या शाळेतील शिक्षक अन् संस्काराचा मोलाचा वाटा ‘ असल्याचे सांगितले.
व्यासपीठावर आमदार आशिष जयस्वाल ,श्रीराम शिक्षण संस्थेचे सहसचिव राजीव पंत , सदस्य अधिवक्ता किशोर नवरे , न्यायधिश हरदास सातपुते , मनसर माईनचे व्यवस्थापक सुहास महात्मे, प्राचार्य डाँ. राजेश शिंगरू, प्राचार्य राहुल गवई मुख्याध्यापिका उषा गडेकर मुख्याध्यापक जयदेव डडोरे , मुख्याध्यापिका मंगला गोल्हर, सरस्वती शिशु मंदिरच्या पुष्पा कांबळे, मंडळाध्यक्ष किरण शहारे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना श्रीधरराव गाडगे यांनी कथा रूपाने विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती बद्दल माहिती दिली. स्वयंप्रेरणेने विद्यार्थ्यांनी स्वताची प्रगती करावी तसेच प्रगती करताना भारतीय संस्कार आणि संस्कृतीची जोड ठेवावी असे आवर्जून सांगितले, आमदार आशिष जयस्वाल यांनी विद्यार्थी सुद्धा सुज्ञ नागरिक असून त्यांनी आपले परिसर स्वच्छ सुंदर आणि प्लास्टिक मुक्त करण्याचे आवाहन केले तथा रामनगरीला दुसरी अयोध्या करण्याचा निर्धार त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषणात दीपक भोले यांनी आपल्या संघर्षमय जीवनाला उजाळा दिला आणि यातून प्रगती कडे वाटचाल करताना श्रीराम शिक्षण संस्थेतील शिक्षक आणि संस्काराचा मोठा वाटा असल्याचे सांगितले त्याचप्रमाणे शाळेची संस्कार व संस्कृतीचा आधार घेऊन वर्तमान विद्यार्थी सुद्धा प्रगती करतील अशी आशा बाळगली.
या कार्यक्रमाप्रसंगी दीपक भोले यांनी संस्था अंतर्गत सरस्वती शिशु मंदिर रामटेक च्या विद्यार्थ्यांचा विकासाकरिता धनादेश प्रदान केला. यावेळी शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन बबलू यादव तर आभार श्रद्धा चिमणकर यांनी मानले.
पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. विद्यार्थी कार्यवाह रक्षण बरबटे, विद्यार्थिनी कार्यवाह श्रेया बंधाटे, ,नयना हटवार यांच्या मार्गदर्शनात आटोपला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर, कर्मचारी , पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.