Sunday, December 22, 2024
HomeFoodsटीसीएलने नेक्स्ट-जनरेशन टीव्ही उत्पादने लॉन्च केली...

टीसीएलने नेक्स्ट-जनरेशन टीव्ही उत्पादने लॉन्च केली…

न्युज डेस्क – आपल्या चार-दशकाच्या दीर्घकालीन, लाभदायी प्रवासामध्ये अधिक मान्यतांची भर करत टीसीएल या जगातील पहिल्या क्रमांकाच्या अँड्रॉईड स्मार्ट टीव्ही ब्रॅण्डने आर-सिटी मॉल, घाटकोपर, मुंबई – रिलायन्स स्टोअर येथे तीन नवीन नेक्स्ट-जनरेशन टीव्ही इनोव्हेशन्स लॉन्च केले आहेत. नुकतेच लॉन्च करण्यात आलेल्या उत्पादनांमध्ये सी८३५: १४४ हर्टझ व्हीआरआर असलेला न्यू जनरेशन मिनी एलईडी ४के गुगल टीव्ही, सी६३५ गेमिंग क्यूएलईडी ४के टीव्ही आणि पी७३५ ४के एचडीआर गुगल टीव्ही यांचा समावेश आहे.

ही उत्पादने खरेदी केल्यानंतर ग्राहक २,९९९ रूपये किंमत असलेला व्हिडिओ कॉल कॅमेरा आणि एसबीआय बँक कार्डसचा वापर करत जवळपास १०,००० रूपयांची अतिरिक्त कॅशबॅक अशा विविध आकर्षक ऑफर्सचा आनंद घेऊ शकतात.

टीसीएल इंडियाचे विपणन प्रमुख विजय कुमार मिक्किलिनेनी म्हणाले, “टीसीएल कोणत्याही कुटुंबामध्ये परिपूर्णपणे सामावून जाणारी उत्पादने यशस्वीरित्या लॉन्च करत आली आहे. आम्ही आधुनिक रचना, आकर्षकता आणि किमान आकाराप्रती आवड लक्षात घेत उत्पादने डिझाइन करतो. तसेच आम्ही प्रिमिअम नवोन्मेष्कारी टीव्ही खरेदी करताना ग्राहकांच्या खिशावर अधिक भार न पडण्याची खात्री देखील घेतो. टीसीएल हा ग्राहक-केंद्रित ब्रॅण्ड आहे आणि आम्ही दीर्घकाळापर्यंत हा प्रवास सुरूच ठेवू.”

नुकतेच लॉन्च करण्यात आलेल्या उत्पादनांची सविस्‍तर माहिती पुढीलप्रमाणे:

१४४ हर्टझ व्हीआरआर असलेला टीसीएल सी८३५ न्यू जनरेशन मिनी एलईडी ४के गुगल टीव्ही:

टीसीएल सी८३५ मध्ये उच्च-स्तरीय वैशिष्ट्यांचे व्यापक संयोजन आहे, जसे १४४ हर्टझ व्हीआआर, ऑनक्यो, आयमॅक्स एन्हान्स्ड, डॉल्बी व्हिजन आयक्यू, डॉल्बी अॅटमॉस, एचडीआर १०+, एमईएमसी, एचडीएमआय २.१ आणि इतर अनेक.

टीसीएल सी८३५ स्थानिक डिमिंग झोन्सचे प्रमाण वाढवत आणि लक्षवेधक कॉन्ट्रास्ट संपादित करण्यासाठी, आकर्षक सुस्पष्टता व क्यूएलईडी तंत्रज्ञानाची शक्ती असलेले एक बिलियनहून अधिक रंग दाखवण्यासाठी आकर्षक ब्राइटनेस कार्यक्षमता देत शक्तिशाली इमेजरीचा स्तर उंचावतो. टीसीएल सी८३५ ५५-इंच, ६५-इंच व ७५-इंच आकारांमध्ये उपलब्ध आहे, ज्यांची किंमत अनुक्रमे ११९,९९० रूपये, १५९,९९० रूपये आणि २२९,९९० रूपये आहे.

१२० हर्ट्झ डीएलजी व गेम मास्टर असलेला टीसीएल सी६३५ गेमिंग क्यूएलईडी ४के टीव्ही:

टीसीएल सी६३५ मध्ये वाइड कर गम्यूट, ४के एचडीआर आणि एमईएमसी (मोशन एस्टिमेशन, मोशन कम्पेन्सेशन) आहे. टीसीएल सी६३५ सुलभ व्हिज्युअल्स देतो, ज्यामुळे सर्वात मुलभूत मूव्ही सीन्स देखील लक्षवेधक बनतात. या नवोन्मेष्कारी टीव्हीमध्ये डॉल्बी व्हिजन व डॉल्बी अॅटमॉस आहे, ज्यामधून ग्राहकांना १०० टक्के डायनॅमिक टीव्ही पाहण्याचा अनुभव मिळण्याची खात्री मिळू शकते.

तसेच, नवीन एचडीआर १०+ तंत्रज्ञानाच्या मदतीने टीसीएल सी६३५ ४के डिस्प्लेसाठी पिक्चर क्वॉलिटी परिपूर्णपणे सानुकूल करतो. हा टीव्ही फ्रेम-टू-फ्रेम बदल, अचूक ब्राइटनेस, कलर सॅच्युरेशन व कॉन्ट्रॅस्ट दाखवण्यासाठी डायनॅमिक टोन मॅपिंगची क्षमता व लाभ कार्यान्वित करतो. टीसीएल सी६३५ ४३-इंच, ५०-इंच, ५५-इंच, ६५-इंच व ७५-इंच आकारांमध्ये उपलब्ध आहे, ज्यांची किंमत अनुक्रमे ४४,९९० रूपये, ५४,९९० रूपये, ६४,९९० रूपये, ८५,९९० रूपये आणि १४९,९९० रूपये आहे.

टीसीएल पी७३५ ४के एचडीआर गुगल टीव्ही:

टीसीएल पी७३५ मध्ये सर्वोत्तम टीव्ही इनोव्हेशन आहे. वाइड कलर गम्यूट, ४के एचडीआर, डॉल्बी व्हिजन आणि एमईएमसी (मोशन एस्टिमेशन, मोशन कम्पेन्सेशन) हा नवोन्मेष्कारी टीव्ही सुलभ व्हिज्युअल्स देतो. टीसीएल पी७३५ सह अॅक्शन-पॅक चित्रपट ते फास्ट–पेस स्पोर्ट्स ब्रॉडकास्ट्स अचूकपणे व सुस्पष्टपणे पाहायला मिळतात. एकीकृत करण्यात आलेले डॉल्बी अॅटमॉस टीव्ही पाहण्याच्या अनुभवामध्ये सर्वांगीण मनोरंजनाची भर करते.

टीसीएल पी७३५ मध्ये गुगल टीव्ही देखील आहे. ग्राहक स्ट्रिमिंग सेवांमधील विविध प्रकारचे कन्टेन्ट पाहण्याचा आनंद घेऊ शकतात. टीसीएल पी७३५ ४३-इंच, ५०-इंच, ५५-इंच व ६५-इंच आकारांमध्ये उपलब्ध आहे, ज्यांची किंमत अनुक्रमे ३५,९९० रूपये, ४१,९९० रूपये, ४९,९९० रूपये आणि ६९,९९० रूपये आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: