अमरावती – डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. याचाच भाग म्हणून स्थानिक तक्षशिला महाविद्यालय अमरावती येथे दिनांक 05 सप्टेंबर 2022 रोजी शिक्षक दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्य स्वंय- चलित महाविद्यालय या संकल्पनेतून विद्यार्थ्यानी शिक्षक होऊन विविध विषय प्रत्यक्ष वर्गात शिकवून अध्यापणाचा अनुभव घेतला.
कला,वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ विभाग व एम.सी. व्ही.सी. विभागातून एकूण 30 विद्यार्थ्यानी या दिवशी शिक्षकाची भूमिका निभावली. बी.ए.भाग एक चा सूरज रताळे ह्या विद्यार्थ्याने प्राचार्याचे कार्य अतिशय उत्तमपने पार पाडले. शिक्षकांनी मूल्याकन करून प्रथम पाच विद्यार्थ्यांना उत्कृष्ठ शिक्षक म्हणून परितोषिक देण्यात आले. महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचा पेन व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजनकुमार सहाय तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट चे सचिव पी.आर.एस.राव. हे होते. त्यांनी विविध उदाहरनाद्वारे शिक्षकाचे महत्व समजाऊन संगितले तर प्राचार्यांनी सर्व विद्यार्थी अध्यापकांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन बी.ए.भाग.दोन.ची विद्यार्थिनी रेशमा धुर्वे हिने केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते॰