Tamil Nadu : तामिळनाडूतील विरुधुनगर येथे फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. विरुधुनगर जिल्ह्यातील सत्तूर भागात असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला. मृतांमध्ये कारखान्यातीलच सहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फॅक्टरीत चार खोल्या होत्या, ज्या स्फोटानंतर कोसळल्या. माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि काही जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नसून शॉर्ट सर्किटमुळे हा अपघात झाल्याचे समजते.
तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यात अनेक फटाक्यांचे कारखाने असून येथे अनेक अपघात झाले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या अपघातानंतर मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी फटाक्यांच्या कारखान्यांमधील सुरक्षा नियमांची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, तरीही अपघात थांबत नाहीत.
As many as three people were killed in a massive explosion at a fireworks factory near Virudhunagar district in Tamil Nadu #TamilNadu #factory #explosion https://t.co/L58UDg71kr
— Kalinga TV (@Kalingatv) January 4, 2025
तेलंगणातही फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट
तेलंगणातील यादद्री-भुवनगिरी जिल्ह्यात शनिवारी एका कारखान्यात झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला. पोलिसांनी ही माहिती दिली. जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक माहितीनुसार, स्फोटक पदार्थ बनवणाऱ्या कारखान्यात हा स्फोट झाला.