नांदेड – महेंद्र गायकवाड
भोकर विधानसभा मतदारसंघात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर असल्याने भोकर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हा मतदारसंघ शिवसेनेकडे सोडवून घ्यावा मी विधानसभा निवडणूक लढवीतो अशी इच्छा तालुकाप्रमुख अमोल धनराज पवार यांनी पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे व्यक्त केली आहे.
विधानसभा निवडणुकीला बराचसा कालावधी शिल्लक असला तरी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून शिवसेना शिंदे गटाचे भोकर तालुकाध्यक्ष विधानसभा अमोल धनराज पवार यांनीही निवडणुकीच्या आखाड्यात ऊढी घेतली असून त्यांनी पक्षश्रेष्ठीकढे निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करून मतदारसंघात परतल्यावर गाव भेटीला सुरुवात केली त्यांना प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे त्यांनी मतदार संघातील भोकर अर्धापूर मुदखेड या तिन्ही तालुक्यातील ग्रामीण भागांना भेटी देण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे.
या तिन्ही तालुक्यात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा वर्ग आहे भोकर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार कमी फरकाने पराभूत झालेला आहे भोकर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेची पकड असल्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात भोकर विधानसभा मतदारसंघ हे शिवसेनेकडे सोडून घ्यावा अशी मागणी अमोल पवार यांनी शिवसेनाप्रमुख एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात युवकांना संधी देणार असल्याचे सांगितल्यानंतर भोकर विधानसभा मतदार संघातील एका सक्रिय तालुका प्रमुखाला संधी मिळेल की नाही हे पुढील काळातच समजेल परंतु अमोल पवार निवडणुकीत उतरल्याने एक युवा चेहरा मतदारासमोर असणार आहे.