Wednesday, January 22, 2025
Homeराज्यपातूर येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न...

पातूर येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न…

स्वामी विवेकानंद युवती मंडळ व स्व.विनायक राखोंडे प्रतिष्ठाण,पातुर व्दारा आयोजन…

पातूर – युवा कार्यक्रम खेल मंत्रालय,भारत सरकार अंगीकृत नेहरू युवा केंद्र,अकोला मेरा युवा भारत संलग्नित साने गुरुजी कला व सांस्कृतिक क्रीडा बहु.मंडळ,पातूर व स्वामी विवेकानंद युवती मंडळ,आणि स्व.विनायक राखोंडे प्रतिष्ठाण,पातुर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.५ जानेवारी २०२५ सकाळी ९ ते ५ पर्यंत तालुका क्रीडा संकुल,पातूर येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

त्यामध्ये मुले व मुलींकरिता वैयक्तिक शंभर मीटर धावणे व गोळा फेक व सांघिक मध्ये मुलीकरिता खो-खो आणि मुलांकरिता कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धे मध्ये विविध संघ व १२७ स्पर्धक सहभागी झाले होते.

यावेळी या कार्यक्रमाला क्रीडा मार्गदर्शक पंच म्हणून देवदत्त खंडेराव व युवाश्री विशाल राखोंडे,अमर बोरकर होते तर स्पर्धेकरिता परिवेक्षक म्हणून किसन कावळे,सचिन इंगळे,रवी कढोने, अभिषेक उगले, प्रज्वल इंगळे, सागर राखोंडे, पल्लवी मांडवगणे, शुभांगी उमाळे उपस्थित होते. या स्पर्धेची सुरवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करुन उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत नोटबुक,पेन पुस्तक व वृक्ष देऊन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व क्रीडा स्पर्धेची माहिती व नियम अटी हे पातूर तालुका स्वयंसेविका कु.पल्लवी मांडवगणे राखोंडे यांनी दिली तर उपस्थित सर्व मान्यवरांनी युवकांना क्रीडा विषयी मार्गदर्शन करून सर्वप्रथम मुलींच्या क्रीडा स्पर्धेला सुरवात करण्यात आली यावेळी सर्वप्रथम शंभर मीटर रनिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमाक प्रेरणा विजय इंगळे,

द्वितीय कांचन दाता अवसरमौल तर तृतीय ज्योती नामदेवराव राखोंडे हिने घेतला तर मुलांमध्ये प्रथम क्रमांक पूर्वेश उपर्वट, द्वितीय प्रशिक इंगळे, तृतीय क्रमांक कुमार इंगळे तर प्रोत्साहन पर करण गवई याने घेतला त्यानंतर मुलींमध्ये गोळा फेक मध्ये प्रथम क्रमांक प्रेरणा संदीप दामोदर, द्वितीय श्रावणी सुनील देशमुख तर तृतीय पूनम रमेश तिडके हिने घेतला तर मुलांमध्ये प्रथम क्रमांक सचिन इंगळे,

द्वितीय आदर्श इंगळे तर तृतीय नंदकिशोर परमाळे याने घेतला तसेच मुलींच्या सांघिक खेळ खो-खो या स्पर्धेत प्रथम क्रमांक स्व.नागेश क्रीडा युवती मंडळ,भंडारज बु.तर स्वामी विवेकानंद युवती मंडळाने दुसरा क्रमाक घेतला त्यानंतर मुलांच्या सांघिक कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक स्व.नागेश क्रीडा मंडळ,भंडारज बु. यांनी घेतला तर द्वितीय क्रमांक मराठा क्रीडा मंडळ,तांदळी व तृतीय क्रमांक एकता युवा क्रीडा मंडळ,

नांदखेड या ग्रुपने घेतला यावेळी सर्व वैयक्तिक विजेतांना व सांघिक खेळा मधील मंडळांना उपस्थित मान्यवर व पंच यांचा हस्ते मेडल, टी शर्ट, प्रमाणपत्र आणि विविध क्रीडा साहित्य देऊन गौरव करण्यात आला यावेळी सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष सागर राखोंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका स्वयंसेविका पल्लवी मांडवगणे यांनी केले.

यावेळी पातूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना कान्होबा स्वयं सहाय्यता महिला बचत गट पातूर कडून अल्पोहार व चहा पाणी देण्यात आले यावेळी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यश इंगळे, कृष्णा सरप, समर्थ इंगळे यांनी परिश्रम घेतले व तालुकास्तरीय स्पर्धा संपन्न झाली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: