Friday, January 17, 2025
Homeराज्यPRI CBO Convergence प्रकल्पाअंतर्गत तालुकास्तरीय सरपंच कार्यशाळा संपन्न...

PRI CBO Convergence प्रकल्पाअंतर्गत तालुकास्तरीय सरपंच कार्यशाळा संपन्न…

पंचायत समिती सावंतवाडी व उमेद अभियान यांच्या वतीने दि.१०जानेवारी रोजी PRI CBO Convergence project अंतर्गत तालुकास्तरीय सरपंच कार्यशाळा सार्वजनिक गणेशोत्सव सभागृह, सावंतवाडी येथे घेण्यात आली.

“गावाचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत व उमेद चे महिला संघटन यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे . ग्रामपंचायत सोबत कार्यरत असणारे विविध विभाग आणि महिला संघटन यातून गावातील विविध समस्यांना उत्तर शोधता येईल”, असे मार्गदर्शन ‘कुडुंब श्री’, केरळ च्या श्रीम. गिरिजा संतोष यांनी केले.

“उमेश चे सावंतवाडी तालुक्याचे काम चांगले आहे सावंतवाडी हा मॉडेल तालुका म्हणून आहेच पण यापुढेही अजून चांगले काम करण्यासाठी आपण समन्वयाने अधिक प्रयत्न करूया “, असे आवाहन मान. गटविकास अधिकारी श्री.वासुदेव नाईक यांनी केले.

प्रकल्पाची उद्दिष्ट्ये, कुडुंबश्री ची ओळख , प्रकल्प उपक्रमामध्ये PRI आणि CBO ची भूमिका , आणि एकत्र काम केल्यामुळे विकासाची गती वाढण्यास कशी मदत होते, यशस्वी ग्रामसभा, citizen committee , उमेद चे कामकाज कसे चालते याविषयी चे मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात आले.

या कार्यशाळेत सहा.गटविकास अधिकारी श्री. मंगेश जाधव, उमेद चे जिल्हा व्यवस्थापक श्री. निलेश वालावलकर, तालुका अभियान व्यवस्थापक श्री प्रदीप ठाकरे , ३७ गावातील सरपंच, तालुका व्यवस्थापक श्री शिवानंद गवंडे, श्रीम. स्वाती रेडकर, श्रीम. रिधिमा पाटकर, DRT श्रावणी वेटे ,BRP निधी म्हापसेकर, उमेद चे प्रभाग समन्वयक, प्रभाग संघ व्यवस्थापक कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रकल्पाची माहिती देण्यासाठी सरपंचांची कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल उपस्थित सरपंचांनी समाधान व्यक्त केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: