Saturday, November 23, 2024
Homeराज्यपत्रकारांसाठी आरक्षित विश्रामगृहात २ सूट ताब्यात देण्यात यावेतालुका पत्रकार संघाची मागणी...

पत्रकारांसाठी आरक्षित विश्रामगृहात २ सूट ताब्यात देण्यात यावेतालुका पत्रकार संघाची मागणी…

शेगाव विकास आराखडा अंतर्गत संतनगरी शेगाव तयार करण्यात आलेल्या विश्रामगृहातील दोन सूट पत्रकारांसाठी आरक्षित असून सदर दोन फूट हे पत्रकारांच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी शेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील थोतांगे यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदनाद्वारे ही मागणी केली. शेगाव शहराच्या विकासासाठी शासनाने साडेपाचशे कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला व ती कामे पूर्णत्वासही नेली.

दरम्यान पत्रकारांना पत्रकार भवन तयार करून द्यावे अशी मागणी तत्कालीन पालकमंत्री तथा कामगार मंत्री भाषण यांच्याकडे करण्यात आली होती. त्यावेळेस तांत्रिक अडचणीमुले ते शक्य न झाल्याने विकास आराखडा निधीतून तयार करण्यात आलेल्या विश्रामगृहातील २ सूट पत्रकारांसाठी कायम आरक्षित करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र सदर विश्रामगृहातील सूट पत्रकारांना अद्याप पर्यंत देण्यात आलेले नव्हते. या संदर्भात. शेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने खामगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील थोटांगे यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन या संदर्भात चर्चा करून पत्रकारांसाठी आरक्षित असलेले २ सूट ताब्यात देण्यात यावे असे निवेदन यावेळी सादर करण्यात आले.

यावेळी थोटांगे यांनी कागदपत्रांची पूर्ण तपासणी करून या संदर्भातील अहवाल विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे निश्चित पाठवून कारवाई केली जाईल असे आश्वासन यावेळी शिष्टमंडळाला कार्यकारी अभियंता थोटांगे आणि उपविभागीय अधिकारी पुंडकर यांनी दिले.

यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष फहीम देशमुख कार्याध्यक्ष संजय सोनोने, सचिव नंदू कुलकर्णी, उपाध्यक्ष अनिल उंबरकर, राजेश चौधरी, दिनेश महाजन, धनराज ससाणे, खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष भोसले, प्रशांत देशमुख आदींची यावेळी उपस्थिती होती.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: