- शाहीर परिषदेच्या तालुका अध्यक्ष पदी:- शाहीर चकोले
- कलावंतांनी निर्व्यसनी राहुन मनोरंजन प्रबोधनाबरोबर कलेवरील निष्ठा अबाधित राखण्याची आवश्यकता:-जिल्हाध्यक्ष सिंगारे
रामटेक – राजु कापसे
रामटेक येथे नुकतीच महाराष्ट्र शाहीर परिषदेची तालुका स्तरीय कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष शाहीर तानबाजी सिंगारे यांच्या निर्देशानुसार घोषित करण्यात आली. यावेळी शाहीर तानबाजी सिंगारे, कोषाध्यक्ष नरेंद्रजी धवराळ यांच्या उपस्थितीत परिषदेचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करुन अभिवादन करण्यात आले.
यामध्ये तालुका अध्यक्ष शाहीर श्यामराव चकोले, कार्याध्यक्ष प्रा.समर मोटघरे, उपाध्यक्ष शाहीर रामदास मोहतकार, सचिव शाहीर युवराज अडकणे, सहसचिव श्रीधरजी पुंड, कोषाध्यक्ष शाहीर दिनेशजी मुन गुरुजी, सदस्य भैयाजी महाजन,बालकदास बागडे, राजकुमार अडकणे,प्रतिमाला गजभिये, आणि सुलोचना नरुले यांचा समावेश करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष शाहीर तानबाजी सिंगारे यांनी कलावंतांनी निर्व्यसनी राहुन मनोरंजना बरोबरच प्रबोधन करुन कलेवरील निष्ठा अबाधित राखण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात कलावंत व रसिकांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.समर मोटघरे यांनी केले, तर आभारप्रदर्शनाची धुरा श्री श्रीधरजी पुंड यांनी सांभाळली, सुत्रसंचालन शाहीर युवराज अडकणे यांनी केले.