Sunday, December 22, 2024
Homeराजकीयपत्रकार संरक्षण कायद्यासंदर्भात केंद्राशी बोलु - अण्णा हजारे...

पत्रकार संरक्षण कायद्यासंदर्भात केंद्राशी बोलु – अण्णा हजारे…

  • नवीन कामगार कायद्यातुन पत्रकाराना वगळले…
  • नवीन कामगार कायद्यावर हरकती नोंदवणार…
  • डॉ. विश्वासराव आरोटे यांनी घेतली आण्णाची भेट…

नागपूर – शरद नागदेवे

पत्रकार संरक्षण कायदया विषयी फार मोठा गवगवा झाला असला तरी कार्यवाही झालेली दिसत नाही म्हनुण सर्व माहीती घेऊन पत्रकार संरक्षण कायदया विषयी पाठपुरावा करू असे ठोस आश्वासन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे यांच्यासह शिष्टमंडळाने राळेगणसिध्दी येथे अण्णांची भेट घेत पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकारांच्या विविध समस्या बाबत चर्चा केली. अण्णा हजारे यावेळी बोलताना म्हणाले की पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आपण सैदव तत्पर आसुन शासनाने याबाबत काय भुमिका घेतली याचीही माहीती घेऊ.

कारण लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणजे पत्रकार असतो मात्र शासन कर्त्याची मानसिकता चांगली असावी लागते पत्रकारांच्या कायद्याविषयी दुर्लक्ष करून शासन काय साध्य करणार असा सवाल करत अण्णा पुढे बोलताना म्हणाले की वेळप्रसंगी पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आपण आग्रभागी राहु असे ते म्हणाले.

डॉ . विश्वास आरोटे यावेळी अण्णाशी चर्चा करताना म्हणाले की कोरोनाकाळामध्ये पत्रकारांनी जीव धोक्यात घालुन साथरोग नियंत्रण करण्यासाठी प्रबोधन केले राज्यात सुमारे २४० पत्रकारांचा कोरोनाने बळी घेतला तात्कालिन अरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना पन्नास लाख रुपयाचे विमा कवच देण्याचे जाहीर केले मात्र ती घोषणा कागदावरच राहिली त्या मयत पत्रकारांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे.

पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच केंद्र शासनाच्या नवीन कामगार धोरणातुन पत्रकाराना वगळले आसुन या कायदयावर हरकत घेणार आसुन अण्णा हजारेकडे पाठबळ देण्याची विनंती केली.यावेळी राज्य पत्रकार संघाचे ब्रॅण्डअम्बेसेडर पत्रकार संजय फुलसुंदर ही उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संपर्क प्रमुख संजय मोरे यांनी पत्रकार संरक्षण कायदयासंदर्भात पत्रकारांच्या समस्या व शासनाची दिरंगाई याबाबतची माहिती अण्णा हजारे यांना पुराव्यासह दिली.

राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव राम तांबे यांनी आभार मानले. डॉ .आरोटेंचा अण्णाच्या हस्ते सत्कार राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे याना अमेरिकन इंटरनॅशनल युनिव्हरसिटी कडुन विद्यावाचस्पती ( डॉक्टेरेट ) मिळाल्या बद्यल अण्णानी त्यांचे कौतुक करून सत्कारही केला

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: