सांगली – ज्योती मोरे
मिरज शहर एस.टी .स्टँड समोरील जागा ताब्यात घेणाऱ्या गुंडांनी मध्यरात्री गोरगरिबांची दुकाने व घरे उध्वस्त केली यासंदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने आज मा.जिल्हाधिकारी व मा. जिल्हापोलिस प्रमुख यांना निवेदन देण्यात आले.
भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा भाऊ ब्रम्हानंद पडळकर यांनी पाच सहा जेसीबी व पोकलॅंड च्या सहाय्याने चारशे – पाचशे गुंड आणून मिरज शहरात दहशत निर्माण केली , स्वतःला वंचितांचे कैवारी समजणाऱ्या लोकांनीच वंचितांची व गरिबांची दुकाने व घरे उध्वस्त केली .
१ .पोलीस अधिकारी यांनी हे सर्व घडू कसे दिले ?पोलिसांची गस्त त्या दिवशी नव्हती का? कोणत्या राजकीय नेत्यांच्या व अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे घडले याचा तपास करून सोक्षमोक्ष लागला पाहिजे
२. अतिक्रमण काढण्याचा कायद्याने अधिकार कोणाचा ?
३. उद्या एखादी घटना घडली तर प्रशासन स्वतः कारवाई करणार की ज्याचा त्याला रस्त्यावर न्याय निवाडा करायला सांगणार
४ . या ठिकाणी अनेक लोक जखमी झाले यावर पोलिसांनी काय कारवाई केली
५ हा हल्ला हा सांगली ,मिरज व कुपवाड महानगरपालिका शहरांवर बाहेरच्या गुंडांनी केलेला हल्ला आहे .
६. शहराच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रकार आहे
७. या प्रकरणामध्ये महसूल व पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका नेमकी काय होती .
८. ब्रम्हानंद पडळकर व त्यांच्या गुंडावर पोलिसांनी कोणती कलमे लावली आहेत , या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्हा शहरवासीयांना मिळायला पाहिजेत
९. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करायला पाहिजे
१० . ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकनास भरपाई मिळायला पाहिजे
११. मिरज शहरावर दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना जबर शिक्षा झाली पाहिजे.
१२. अत्याचार ग्रस्तांवर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते मागे घेण्यात यावेत.
या सर्व गोष्टींची जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांनी दखल घेऊन कडक कारवाई करावी अन्यथा न्याय मागण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल , असे निवेदनात म्हंटले आहे.
यावेळी शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज, महापौर दिग्विजय सुर्यवंशी , सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष पद्माकर जगदाळे , बाळासाहेब व्हनमोरे ,प्रमोद इनामदार ,हरिदास पाटील , अतहर नायकवडी , विष्णू माने , शेडजी मोहिते , मुस्ताकअली रंगरेज ,हारून खतीब , समीर कुपवाडे , युवराज गायकवाड, अभिजित कोळी,
विज्ञान माने , संदीप व्हनमाने , डॉ शुभम जाधव ,आकाराम कोळेकर ,अर्जुन कांबळे , निलेश शहा , महालिंग हेगडे , मदन पाटील , मुन्ना शेख , कुमार वायदंडे , सचिन जाधव , रुपेंद्र जावळे , विजय नाईक , सैफ भालदार , सुभाष तोडकर ,समाधान मोहिते , सचिन केंचे , आदी पदाधिकारी उपस्थित होते.