Wednesday, December 25, 2024
Homeराज्यरस्त्यावर बसणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करा, शिवगर्जना युवा प्रतिष्ठान यांची निवेदन देऊन मागणी...

रस्त्यावर बसणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करा, शिवगर्जना युवा प्रतिष्ठान यांची निवेदन देऊन मागणी…

रामटेक – राजु कापसे

रस्त्यावर बसणाऱ्या जनावरांमुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असून होणारे अपघात थांबविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे व बेजबाबदार पशुपालकांकडून दंड आकारावा असे निवेदन शिवगर्जना युवा प्रतिष्ठान,मनसर तर्फे प्रशासनाला करण्यात आले आहे.

दोन दिवसाअगोदर मनसर-रामटेक मार्गावर वाहिटोला येथे भरदाव ट्रकच्या धडकेत एकूण १२ निष्पाप वासरांचा जीव गेला होता.यात ट्रकचालकासहित पशुपालकाचीही निष्काळजीपणा असावी असं म्हणता येईल.याच परिसरात नव्हे तर नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील पवनी,देवलापार,चोरबाहुली,कान्द्री माईन,मनसर,शितलवाडी,रामटेक अशा मुख्य मार्गावर देखील जनावरे उभे अथवा बसून असल्याचे चित्र दिसून येतात.

अशातच रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो तो वेगळा भाग.मात्र या जनावरांमुळे अनेक गंभीर स्वरूपाचे अपघात देखील झाल्याचे लक्षात येते.यात जनावरांच्या आणि सामान्य माणसांच्या देखील जीवाला धोका निर्माण होतो.अशा वेळी या जनावरांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.

रस्त्यावर असणाऱ्या जनावरांची सोय करावी व खासगी मालकीचे जनावरे असल्यास मालकावर दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी शिवगर्जना युवा प्रतिष्ठान मनसर यांच्यातर्फे उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे..

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: