Sunday, December 22, 2024
Homeराजकीयअखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या व्यक्ती वर...

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या व्यक्ती वर कार्यवाही करा – गौरव मोरे…

दि. २२/११/२०२२ रोजी शहरातील जुनी वस्ती परिसरातील हकीम सैफी या नामक व्यक्ती ने अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा फोटो सोशल मिडिया वर पोस्ट केला होता.

त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर श्रद्धा व प्रेम करणाऱ्या असंख्य व शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. शिवप्रेमींच्या भावनांचा उद्रेक होवून अनुचित प्रकार घडण्यापूर्वी संबंधित व्यक्ती वर गुन्हा दाखल करून, तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष गौरव मोरे यानी शहर पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांच्याकडे एका निवेदना द्वारे केली.

कारवाई न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे तीव्र आंदोलन करन्यचा इशारा दिला आहे. निवेदन देतेवेळी सुनीलभाऊ पुंड,रोहन नवघरे,चेतन सोळंके,अनिकेत शिरभाते, प्रजेश बुटे,वैभव महल्ले,आशिष कावरे,सचिन काटोले,विशाल ठाकरे,आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: