रामटेक – राजु कापसे
श्रीराम शिक्षण संस्था रामटेक येथील ताई गोळवलकर विज्ञान महाविद्यालय हे तालुक्यातील एकमेव विज्ञान महाविद्यालय असून गेल्या एक वर्ष्यापासून सदर महाविद्यालात इनक्युबेशन, इनोव्हेशन आणि रिसर्च सेंटर (Incubation, Innovation and Research Center) (MSME) कार्यान्वित आहे.
हे केंद्र संशोधन आणि अनुसंधान क्षेत्रात नाविन्यपूर्ण कल्पनांना वाव देण्यासाठी देश्यातील प्रत्येक व्यक्तीला अनुदान देवून उद्योग जगात सक्षम बनविण्यास सहकार्य करण्याचे काम करते. महाविद्यालयातील नाविन्यपूर्ण कल्पनेस भारत सरकार निगडीत सूक्ष्म, लघु आणि मध्यम (MSME) संस्थेमार्फत HACKATHON २.० अंतर्गत अनुदान प्रदान करण्यात आले.
त्यासाठी देशभरातून अनेक नाविन्यपूर्ण कल्पना पाठवण्यात आल्या, त्यापैकी महाराष्ट्रातील पाच महाविद्यालयाला हा बहुमान मिळाला असून सदर महाविद्यालय एकमेव विज्ञान महाविद्यालय आहे ही विदर्भ तसेच रामटेक तालुक्यासाठी गौरवाची बाब आहे.
ताई गोळवलकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरु यांच्या विद्यार्थी प्रा.डॉ. दिनेश दुर्योधन यांना हे अनुदान प्रदान केले गेले असून त्याच्या नाविन्यपूर्ण कल्पनेचा विषय “ Synthesis of D-Xylose from rice husk a waste hull”, Waste to wealth creation हा होता.
याप्रसंगी संस्थेचे अध्याक्ष्या सौ.कांचनताई नितीनजी गडकरीं, उपाधक्ष्य डॉ. समयजी बनसोड, सचिव डॉ प्रशांतजी पंडे , संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. राजेश सिंगरु व Incubation center (MSME) चे समन्वयक डॉ. संतोषजी जेंगठे तसेच सर्व शिक्षक व शक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रा.डॉ. दिनेश दुर्योधन यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेछ्या दिल्या.