T20-WorldCup : वर्ल्ड कप नंतर चाहते आता टी-२० विश्वचषकाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आगामी 20 विश्वचषक स्पर्धेला अजून काही महिने बाकी आहेत, पण या स्पर्धेतील सर्वात मोठ्या सामन्याची तारीख जाहीर झाली आहे. वृत्तानुसार, भारतीय संघ 5 जूनला आयर्लंडविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करेल. त्याचा पाकिस्तानशी सामना 9 जून रोजी होण्याची शक्यता आहे.
आयसीसीच्या मोठ्या टूर्नामेंटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीची क्रिकेट चाहते नेहमीच वाट पाहत असतात. अलीकडेच विश्वचषक 2023 च्या साखळी फेरीत दोन्ही संघ आमनेसामने आले होते. यावेळी ब्लू संघाने ग्रीन संघाचा पराभव केला होता. दोन्ही संघांमध्ये पुन्हा एकदा चुरशीची लढत होण्याची चाहत्यांना अपेक्षा आहे. यावेळी ही रोमांचक स्पर्धा अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात पाहायला मिळणार आहे.
T20 विश्वचषकातील भारतीय संघाचे संभाव्य शेड्यूल:
5 जून – बनाम आयरलैंड – न्यूयॉर्क
9 जून – बनाम पाकिस्तान – न्यूयॉर्क
12 जून – बनाम अमेरिका – न्यूयॉर्क
15 जून – बनाम कनाडा – फ्लोरिडा
20 जून – बनाम न्यूजीलैंड – बारबाडोस
22 जून – बनाम श्रीलंका – एंटीगुआ
24 जून – बनाम ऑस्ट्रेलिया – सेंट लूसिया
अंतिम आणि उपांत्य फेरीचे सामने कुठे खेळवले जातील?
साखळी फेरीनंतर बाद फेरीचे सामने सुरू होतील. या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना 26 जून रोजी गयाना येथे होणार आहे. दुसरा उपांत्य सामना 28 जून रोजी त्रिनिदाद येथे होणार आहे. पहिला आणि दुसरा उपांत्य सामना जिंकणारे संघ 29 जून रोजी बार्बाडोस येथे विजेतेपदासाठी स्पर्धा करतील.
26 जून – पहला सेमीफाइनल – गयाना
28 जून – दूसरा सेमीफाइनल- त्रिनिदाद
29 जून – फाइनल- बारबाडोस