T20 World Cup 202 : T20 च्या विश्वचषकामध्ये अफगाणिस्तानने बरेच उलटफेर घडवून आणले आजच्या रोमहर्षक सामन्यात बांगलादेशचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. त्याचवेळी स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. टी-२० विश्वचषकात अफगाणिस्तानचा संघ प्रथमच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. तर दक्षिण आफ्रिकेने यापूर्वी दोनदा उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र, दोन्ही वेळा त्यांना उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.
दक्षिण आफ्रिका प्रथमच फायनलमध्ये पोहोचेल का?
दक्षिण आफ्रिकेने अद्याप टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळलेला नाही. 2009 आणि 2014 च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत धडक मारली होती. 2009 मध्ये पाकिस्तानच्या हातून सेमीफायनलमधून बाहेर पडावे लागले होते. तर 2014 च्या विश्वचषकात भारताने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा प्रवास संपवला होता.
या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेची कामगिरी
चालू विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा संघ आतापर्यंत अजिंक्य ठरला आहे. ग्रुप स्टेजमध्ये दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा 6 गडी राखून, नेदरलँडचा 4 गडी राखून, बांगलादेशचा 4 धावांनी आणि नेपाळचा 1 धावांनी पराभव केला. तर सुपर-8 मध्ये दक्षिण आफ्रिकेने यूएसएचा 18 धावांनी, इंग्लंडने 7 धावांनी आणि वेस्ट इंडिजचा 3 गडी राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिकेला कोणत्याही किंमतीत उपांत्य फेरी जिंकून प्रथमच टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळायचा आहे.
या विश्वचषकात अफगाणिस्तानची कामगिरी
सध्याच्या विश्वचषकात अफगाणिस्ताननेही चमकदार कामगिरी केली आहे. अफगाणिस्तानने ग्रुप स्टेजमध्ये युगांडाचा 125 धावांनी, न्यूझीलंडचा 84 धावांनी आणि पापुआ न्यू गिनीचा 7 गडी राखून पराभव केला होता. तर ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानला वेस्ट इंडिजकडून १०४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. सुपर-8 मध्ये भारताने अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव केला. यानंतर अफगाणिस्तानने दमदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी तर बांगलादेशचा 8 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. अफगाणिस्तानने या स्पर्धेत न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशचा पराभव करून आपले इरादे व्यक्त केले आहेत. अफगाणिस्तानला या लयीत अंतिम फेरीत प्रवेश करायचा आहे.
दोन्ही संघापैकी कोणता संघ वरचढ?
अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका टी-20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत दोनदा आमनेसामने आले आहेत. दक्षिण आफ्रिकेने दोन्ही वेळा विजय मिळवला आहे. 2010 च्या विश्वचषकात दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने आले होते. यामध्ये दक्षिण आफ्रिकेने ५९ धावांनी विजय मिळवला. यानंतर 2016 च्या विश्वचषकात दोन्ही संघ आमनेसामने आले. यामध्ये दक्षिण आफ्रिकेने 37 धावांनी विजय मिळवला. या आकडेवारीत जरी दक्षिण आफ्रिका बलाढ्य दिसत असली तरी अफगाणिस्तानचा संघ त्यावेळी कमकुवत मानला जात होता. आज अफगाणिस्तान कोणत्याही संघाला पराभूत करण्यास सक्षम आहे. अफगाणिस्तानने या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशला पराभूत करून याचा पुरावा दिला आहे. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिका अफगाणिस्तानला कोणत्याही किंमतीत हलके घेण्याचा प्रयत्न करणार नाही.
𝐓𝐡𝐢𝐬 𝐕𝐈𝐂𝐓𝐎𝐑𝐘 𝐦𝐞𝐚𝐧𝐬 𝐭𝐡𝐞 𝐰𝐨𝐫𝐥𝐝 𝐭𝐨 𝐮𝐬! 🤩👏
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) June 25, 2024
Congratulations to the entire nation! 🙌#AfghanAtalan | #T20WorldCup | #AFGvBAN | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/R2vJKNiAHG