सांगली – ज्योती मोरे
सांगलीतील विश्रामबाग परिसरात असणाऱ्या उड्डाणपुलाखालील रेल्वे गेट क्रमांक 130 भुयारी मार्ग करण्याचा गाठ रेल्वे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने घातला परंतु या रेल्वेने परिसरात 15 ते 20 हजार लोक वस्ती असल्याने या लोकांना येण्या जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने, या पादचारी मार्गाऐवजी या ठिकाणी नांदेड प्रमाणे वाहनांसाठी भुयारी रस्ता करावा.
या मागणीसाठी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून नागरिकांचा प्रशासकीय स्तरावर लढा सुरू आहे.परंतु अजूनही त्यावर ठोस उपाययोजना न झाल्याने आज रेल्वे गेट संघर्ष कृती समितीच्या वतीने रेल्वे गेटमध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आला. यावेळी माजी आमदार शरद पाटील, रवी खराडे, सचिन लाड, प्रभाग क्रमांक 8 चे नगरसेवक विष्णू माने, नगरसेवक राजेंद्र कुंभार, नगरसेविका कल्पना कोळेकर, नगरसेविका सोनाली ताई सागरे,प्रसाद वळकुंडे, प्रदीप साळवी, अजित दुधाळ, रणजीत तावडे, सुनील पाटील, शशिकांत गायकवाड, सुनील भोसले, रंगराव शिंपूकडे,अपंग सेवा केंद्राचे तसेच नाथाची लाड विद्यालयाचे विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.