अकोला : शेतकरी संघटना आता येत्या लोकसभा आणि विधानसभा मध्ये आपले उमेदवार देणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी अकोल्यात दिली होती, त्यांच्या पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी घेणे सुरू असून अकोला लोकसभेत कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच बरोबर विधानसभेसाठी सुद्धा उमेदवारांचा शोध सुरू केला आहे.
जगाचा पोशिंदा शेतकरी हा नेहमीच दिशाहीन पक्षाच्या सोबत राहिला सर्वच पक्षांना सहकार्य केले मात्र व्यवस्थेत शेतकर्यांना अपेक्षित असलेले काहीच मिळाले नसल्याने म्हणूनच स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली. आणि या दोन्ही निवडणुकीला आपले उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रभर उभे करणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष घनवट यांनी अकोल्यात सांगितले. भ्रष्ट नेत्यांच्या कचाट्यातून देश वाचवा. स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अनिल घनवट व महीला आघाडी अध्यक्षा श्रीमती सीमाताई नारोडे व प्रदेश अध्यक्ष मा. मदुसुधन हरणे हे नोव्हेंबर 22 /2023 पासुन महाराष्ट्रात पक्ष बांधणी दौरा सुरू केला यवमाळ येथुन सुरुवात झाली.
अकोला येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात मा. शिरीष धोत्रे, सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती अकोला यांनी सत्कार केला सत्कार समारंभ संपन्न झाल्यानंतर लगेच तेथील सभागृहात जिल्ह्यातील तमाम शेतकरी व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. ललितदादा बाहले यांच्या अध्यक्षेखाली सभा आयोजित कार्यक्रमात शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष पदी मा. अविनाश पाटील नाकट यांची नियुक्ती केली. व मा. सुरेशभाऊ जोगळे यांची स्वतंत्र भारत पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. स्वतंत्र भारत पक्ष महीला आघाडी अध्यक्षा पदी श्रीमती सुनिता गावंडे यांची तर युवा आघाडी अध्यक्ष पदी मा. जसराज ललित बहाले यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी उपस्थित मा. धनंजय मिश्रा यांची स्वतंत्र भारत पक्षाच्या प्रवक्ते पदी नियुक्ती केली. ह्या वेळी प्रमुख उपस्थितीत मा. सतिश देशमुख, विलास ताथोड, अरविंद तायडे, शरद सरोदे, गुलाबराव म्हासाये पाटील, प्रदीप डांगे, विजय मोरे, विनोद देशमुख, विनोद मोहकार, व मोठ्या संख्येने शेतकरी व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ह्या वेळी उपस्थित होते.