Thursday, December 12, 2024
Homeमनोरंजनस्वप्नीलचा बेधडक डॅशिंग अंदाज...

स्वप्नीलचा बेधडक डॅशिंग अंदाज…

मुंबई – गणेश तळेकर

मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस आणि चॉकलेट हिरो अशी ओळख असणारा अभिनेता स्वप्नील जोशी ह्याचा बेधडक डॅशिंग अंदाज लवकरच पहायला मिळणार आहे. वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर स्वप्नील आता आगामी ‘जिलबी’ या मराठी चित्रपटात विजय करमरकर या डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटाचे दमदार मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे . आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित ही खुमासदार ‘जिलबी’ १७ जानेवारीला आपल्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले आहे.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना स्वप्नील सांगते की, ‘आपला पोलिसी खाक्या दाखवत चोख कामगिरी बजावणारा हा पोलीस अधिकारी आहे. माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका मला करायला मिळाल्याचा आनंद आहे. विशेष म्हणजे पोलिसांचा अंदाज, त्यांच्या जबरदस्त व्यक्तिमत्वाचा लहेजा हे सगळं करण्यात एक वेगळीच मजा आली.

प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा ‘जिलबी’ हा चित्रपट आहे. भूमिका कोणत्याही प्रकारची असली, तरी ती चांगली व्हावी यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात. एकाच प्रकारच्या भूमिकांमध्ये अडकून पडायचं नसल्याने ही वेगळी भूमिका स्वीकारल्याचं स्वप्नील सांगतो.

स्वादिष्ट जिलबी वेगवेगळ्या प्रक्रियांमधून जात असते.‘जिलबी’ हा चित्रपटसुद्धा वेगवेगळ्या चवींचा आस्वाद आपल्याला देणार आहे, ज्यात विविध व्यक्तिरेखा, त्यांचे स्वभाव वैशिष्ट्ये आणि सोबत रहस्याचा थरार असं बरंच काही आहे.

‘जिलबी’ चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. आनंद पंडित आणि रूपा पंडित हे चित्रपटाचे निर्माते आहेत. क्रिएटिव्ह दिग्दर्शन आणि सहनिर्मितीची जबाबदारी राहुल व्ही. दुबे यांनी सांभाळली आहे. छायांकन गणेश उतेकर तर कलादिग्दर्शन कौशल सिंग यांचे आहे. कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: