अकोला : दोन दिवस होऊ घातलेल्या ९ व्या राज्यस्तरीय वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनात स्वागत अध्यक्ष यांनी वैद्यकीय सेवेचा धर्म जोपासला आहे. संमेलन स्थळी निशुल्क आरोग्य तपासणी शिबिराची सेवासंमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. सचिन म्हैसने स्वतः देत आहेत.
राष्ट्रसंतांचे साहित्य केवळ वाचण्यासाठी नसून ते आचरणात आणण्यासाठी आहे. त्यासाठी केवळ भाषणे देऊन चालणार नाही तर ती आचरणात आणणे गरजेचे आहे याच वृत्तीचा प्रत्यय या संमेलनाचे स्वागताध्यक्ष यांच्या या कृतीतून संमेलनस्थळी दिसत आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनाच्या प्रवेशद्वारावरच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये येणाऱ्या रुग्णाची मोफत तपासणी करून गरजूना मोफत औषधे वितरित करण्यात आली.अमरावती येथे होणाऱ्या विचार साहित्य संमेलनातही डॉ. सचिन पाटील वैद्यकीय सेवेचा धर्मं जोपसणार आहेत.