व्यक्तिगत स्वच्छतेकडून सामाजिक स्वच्छतेकडे हा उपक्रम…
अमरावती – स्थानिक श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथे ‘आय लव अमरावती’,’सुंदर अमरावती-स्वच्छ’ अमरावती या अभियाना अंतर्गत महाविद्यालयाची आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली.
श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट च्या अध्यक्ष कीर्तीताई अर्जुन यांच्या संकल्पनेतून व्यक्तिगत स्वच्छतेकडून सामाजिक स्वच्छतेकडे हा उपक्रम राबविण्यात येत असून प्रथम आपण जिथे राहतो तो परिसर, महाविद्यालय परिसर स्वच्छ करावा सोबतच वृक्षरोपण आणि वृक्ष संवर्धन करावे या उद्देशाने स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. याची सुरुवात दि. 21 मार्च 2023 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयापासून करण्यात आली.
संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष डॉ.कमलताई गवई, विद्यमान अध्यक्ष कीर्तीताई अर्जुन, संस्थेचे सचिव पी आर एस राव, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा सचिन पंडित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य मल्लू पडवाल, तक्षशिला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ.कमलाकर पायस, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा सुनिता श्रीखंडे, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ प्रणाली पेटे, डॉ.सुनील कुमार,
डॉ ओम प्रकाश बोबडे, डाॅ पंडित राठोड ,प्रदीप अंभोरे ,डॉ दिनेश धाकडे, प्रा शुद्धोधन कांबळे, प्रा पूजा महाला यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि तक्षशिला महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना पथकातील विद्यार्थ्यांनी या स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला आणि महाविद्यालयाचा परिसर आणि परिसरातील वस्तीची स्वच्छता केली.