सांगली – ज्योती मोरे
गेल्याच आठवड्यात सांगली येथे पकडण्यात आलेल्या पाच कोटी 79 लाखांच्या फेल माशांच्या उलटीच्या तस्करीतील मुख्य सूत्रधारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व सांगली शहर पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळाशील येथून ताब्यात घेऊन, 18 कोटी 60 लाखांची व्हेल माशाची उलटी जप्त केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्याच आठवड्यात 8 फेब्रुवारी रोजी सांगलीतील शामराव नगरातील डॉ. एपीजे अब्दुल कलाम कॉलेज जवळून सलीम गुलाब पटेल, सांगली व अकबर याकूब शेख व 51 राहणार मुस्लिम वाडी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून सुमारे 5 कोटी 79 लाखांची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली होती.दरम्यान या दोघांच्याकडेही कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी सदर उलटी सिंधुदुर्ग मधील एका साथीदाराने विक्रीसाठी दिल्याचे सांगितले होते.
त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह शहर पोलिसांना सिंधुदुर्गमधील मुख्य सूत्रधारास पकडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या दोन्ही पथकांनी संयुक्तरीत्या कारवाई करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळाशील गावातील निलेश प्रकाश रेवंडकर वय 42 यास शिताफिने पकडून त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने गुन्हा कबूल केला.
त्याच्या जवळील उर्वरित उलटी मालवण पोलिसांना खोटी माहिती देऊन समुद्रकिनाऱ्यावर बेवारस स्थितीत पडल्याची सांगून ती पोलिसांना जप्त करायला भाग पाडले होते. अशी माहिती मिळताच मालवण पोलिसांच्या ताब्यातील सदर 18 किलो 600 ग्रॅम वजनाची सुमारे 18 कोटी 60 लाखांची उलटी सांगली पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मुद्देमालासह मुख्य सूत्रधार प्रकाश रेवंडकर यास ताब्यात घेऊन पास कमी सांगली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार, अच्युत सूर्यवंशी, जितेंद्र जाधव,
राजू शिरोळकर,अमोल ऐदाळे,संदीप पाटील, संकेत मगदूम, राहुल जाधव, मच्छिंद्र बर्डे ,सागर टिंगरे, गौतम कांबळे, अजय बेंद्रे, संतोष गळवे, संकेत कानडे, कॅप्टन गुंडवाडे, ऋषिकेश सदामते,शशिकांत जाधव, सांगली शहर पोलीस ठाणे कडील आरिफ मुजावर, गणेश कांबळे, गुंडोपंत दोरकर, आणि वन विभाग सांगलीकडील युवराज पाटील, अजित कुमार पाटील,तुषार कोरे, सागर थोरवत आदींनी केली.