Monday, December 23, 2024
HomeMarathi News TodaySushmita Sen | सुष्मिता सेन पहिल्यांदाच एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार…

Sushmita Sen | सुष्मिता सेन पहिल्यांदाच एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार…

Sushmita Sen will be seen as a transgender : बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हॉटस्टारच्या वेब सीरिज ‘आर्या’मध्ये दमदार परफॉर्मन्स दिल्यानंतर आता एका नव्या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. सुष्मिता सेनने तिच्या आगामी वेब सीरिजमधील तिचा फर्स्ट लूक जारी केला आहे. अभिनेत्रीचा लूक पाहून ती ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिस युनिव्हर्स पहिल्यांदाच ट्रान्सजेंडरची भूमिका साकारताना दिसणार आहे. सुष्मिता सेनचा हा अवतार पाहून प्रत्येकजण या वेबसिरीजबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. कोणत्या प्रसिद्ध ट्रान्सजेंडरचे सुष्मिता सेन कहाणी ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणणार आहे. ते जाणून घ्या

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुष्मिता सेन तिच्या आगामी वेब सीरिजमध्ये सुप्रसिद्ध ट्रान्सजेंडर गौरी सावंतची भूमिका साकारणार आहे. या वेब सिरीजच्या माध्यमातून अभिनेत्री गौरी सावंतचे आयुष्य जगासमोर आणणार आहे. गौरी सावंत यांनी केवळ ट्रान्सजेंडर समुदायाच्या बाजूने आवाज उठवला नाही तर त्यांना समाजात आदर आणि सन्मान मिळवून देण्यासाठी खूप काम केले आहे. मात्र, रिपोर्ट्सनुसार, वेब सीरिजमध्ये गौरी आणि तिच्या दत्तक मुलाचे नाते दाखवण्यात येणार आहे.

सुष्मिताला गौरीचे पात्र आवडले
जेव्हा या वेब सीरिजसाठी सुष्मिता सेनला अप्रोच करण्यात आले तेव्हा तिला ट्रान्सजेंडर गौरीचे पात्र आवडले. गौरी सावंत या सखी चार चौघी ट्रस्टच्या संस्थापक आणि संचालिका आहेत. तिने 2000 मध्ये सुरक्षित लैंगिक संबंधांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आणि ट्रान्सजेंडर समाजाच्या समस्यांशी लढा देण्यासाठी याची सुरुवात केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: