रामटेक – राजु कापसे
अंबाला येथील सूर्य मंदिरात 14 ते 16 फेब्रुवारी दरम्यान सूर्य महायज्ञ व महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात दररोज सकाळपासून सायंकाळपर्यंत महायज्ञ व महापूजा करण्यात येत आहे. 16 फेब्रुवारीला रथ सप्तमीला दुपारी पूर्णाहुती होणार आहे.
यानंतर दुपारी 3 वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आयोजन समितीचे अखिल भारतीय व्यापारी संघाचे अधक .बी. सी. भरतिया, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील मुलमुले, संजय मुलमुले यांनी केले आहे