शिक्षणासोबत विद्यार्थांच्या आरोग्याची घेतात काळजी.
नियमित दिले जातात योगा व व्यायामाचे धडे.
विद्यार्थ्यानं बरोबर शिक्षक ही करतात सूर्यनमस्कार.
नियमित योगा व व्यायामासाठी दोन शिक्षकांची केली नेमणूक.
शाळेकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतल्या जात असल्यामुळे पालक आनंदीं.
नरखेड – अतुल दंढारे
एस. आर. के. इंडो पब्लिक स्कूल, जलालखेडा येथील शाळेच्या प्राचार्य शुभांगी अर्डक शाळेत नव नवीन उपक्रम राबवत आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्याना शिक्षण दिलं जाते परंतु शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी त्यांना आरोग्य विषयकधडे देणे गरजेचे असल्याचे मत प्राचार्य शुभांगी अर्डक यांनी व्यक्त केले असून त्यांनी. विद्यार्थांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून दररोज सकाळी योगा व व्यायामाचे शिक्षण द्यायला सुुरवात केली आहे.
शाळेच्या पटांगणात दररोज विद्यार्थ्याना प्राणायाम, योगा, व्यायाम करायला लावतात त्यासाठी शाळेच्या वतीने दोन शिक्षकांची नेमणूक सुध्दा करण्यात आली आहे. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. या धावपळीच्या जीवनात कोणीच आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही. परंतु आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यात जर लहान पणापासून आरोग्याची काळजी घेतली तर जीवनात कधी आरोग्य विषयी समस्या निर्माण होणार नाही असे मत योग शिक्षण यांनी व्यक्त केले.
शाळेमध्ये दररोज विद्यार्थ्याना योगा, व्यायाम शिकवल्या जात असून विद्यार्थ्यानं सोबत शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सुद्धा नियमित योगा करत आहे. विशेष म्हणजे शाळेतील 683 विद्यार्थी व 40 शिक्षक गेल्या एक महिन्यापासून सूर्यनमस्कार करत असून हा उपक्रम नियमित सुरू राहणार असल्याची माहिती प्राचार्य यांनी दिली. शाळेकडून विद्यार्थांच्या आरोग्याची नियमित काळजी घेतली जात असल्यामुळे पालक आनंदी आहे. शिक्षनासोबत आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत पालकांनी सुद्धा व्यक्त केले आहे.