सुरज यादव संस्थापक एकनिष्ठा फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना बुलढाणा जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय गौ-सेवा संघ विदर्भप्रांत अध्यक्ष, रूग्ण हक्क संरक्षण समिती बुलढाणा जिल्हा संघटक तथा पत्रकार हे गेल्या २०१३ पासुन सामान्य रुग्णालयात निःशुल्क सेवा देत आहे सर्वात महत्वाची भूमिका त्यांनी कोरोना काळात योग्य पणे पार पाडली त्यावेळी अशी भीषण परिस्थिती होती.
एक पण व्यक्ती घराच्या बाहेर निघण्याची हिंमत करत नव्हते त्यावेळी या निष्पाप रुग्ण सेवकाने आपल्या जिवाची पर्वा न करता आपल्या सहकारी मित्रांना घेऊन आर्थिक मदत, ५० दिवस रस्त्यावरच्या लोकांना दोन टाईम जेवणाची सोय केली इतकेच नाही तर त्यांनी ग्रामीण भागातून उपजिल्हा रुग्णालय खामगांव मध्ये प्रसुतीसाठी येणाऱ्या गरीब रूग्ण महिला करीता वेलो वेळी रक्तदाते देऊन रक्ताची सोय करून दिली फक्त बुलढाणा जिल्हा नव्हे तर ऑल इंडिया मध्ये त्यांनी प्लाझ्मा सुद्धा पुरविले.
त्यांना सामान्य रुग्णालयात प्रमाणपत्र शिल्ड देऊन सन्मानित सुद्धा करण्यात आलेले त्यावेळेस कोरोना मध्ये बेवारस रूग्ण गौ-सेवा कार्य सतत सुरू ठेवलेले आहे आणि ते आज पर्यंत अविरत पणे त्यांची सेवा सुरूच आहे असे असता दिनांक २२ व २३ डिसेंबर रोजी त्यांनी सामान्य रुग्णालयात जे सुविधा उपलब्ध नाही होत आहे ही तक्रार केली म्हणून काही बोटावर मोजण्या सारखे ठराविक डॉक्टरांनी त्यांच्या ज्या चुकी आहे.
त्या उघड नाही व्हायला पाहिजे त्यांनी दिनांक २८ डिसेंबर रोजी सुरजभाऊ यादव बदनाम करण्यासाठी खोटी तक्रार केलेली आहे त्यात काही ठराविक डॉक्टर त्यांची खासगी दुकानदारी बंद होईल म्हणून ईतर डॉ ची ईच्छा नसतांना त्यांच्या पण सह्या घेतल्या ही चर्चा सर्वत्र कर्मचारी व जनसामान्य लोकां मध्ये होत आहे बाकीच्या डॉक्टरांना पण त्यांच्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.