सांगली – ज्योती मोरे
सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मार्फत महात्मा गांधी जयंती चे औचित्य साधून सुरज फॉउंडेशन अंतर्गत येणाऱ्या प्रशाला व परिसर यांचा साठी स्वच्छता सप्ताह व स्वच्छता स्पर्धेचे आयोजन केलेले आहॆ.
दिनांक 23 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2022 या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे त्याचे आज या साप्ताहचे औपचारिक उदघाटन डॉक्टर हर्षद दिवेकर व हिमांशू लेले यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्री. प्रशांत चव्हाण उपप्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम यांनी केले या उपक्रमाबद्दल माहिती दिली.
हा कार्यक्रम राबवण्यामागील हेतू उद्देश सांगितला.प्रामुख्याने शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य संस्था म्हणून सुरज फाउंडेशन ची नावलौकीक आहे त्याचबरोबर उपक्रमशील , नाविन्यपूर्ण व समाजाभिमुख शिक्षण देण्यास सुरज फाउंडेशन सदैव अग्रक्रम असतो.विद्यार्थ्यामध्ये सामाजिक बांधिलकी व समाजासाठी असणारी कर्तव्य विद्यार्थ्यांना जाणीव करून देण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत असतात.
त्यानंतर डॉक्टर दिवेकर यांनी आपल्या मनोगतांमध्ये आजचा विद्यार्थी कसा असावा आणि स्वच्छता कशी असावी याबद्दल सविस्तर उदाहरण देऊन स्पष्ट केले मुलांनी चॉकलेट्स बिस्किट्स किंवा चिप्स खाल्ल्यानंतर त्यावरील जे प्लास्टिक कव्हर असते ते कसे ही न फेकता ते खिशामध्ये ठेवून जिथे कचराकुंडी असेल त्यामध्ये टाकावे मग ते घरामध्ये अथवा शाळेच्या ठिकाणी अथवा कोणत्याही ठिकाणी आपण असलो तरी हे नियम पाळावेत आपल्या जगातील लोकसंख्येच्या दीडपट कचरा पृथ्वीवार असल्याचे त्यांनी सांगितले त्यासाठी त्यास कारणीभूत आपणच आहोत प्लास्टिक जाळल्यामुळे जे दुष्परिणाम आहेत ते आपल्यासाठी घातक असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच हिमांशू लेले त्याने फर्ग्युसन कॉलेज मधून शिक्षण घेतल्यानंतर मित्रमेळा या नावाने एक सामाजिक संस्था स्थापन केले आणि त्या माध्यमातून प्लास्टिक या विषयावर ते काम करतात. प्लास्टिक गोळा करणे व त्यापासून रिसायकल वस्तू बनविणे यात त्यांचा हातखंडा आहे.
त्यांनी विद्यार्थ्यांच्या समोर एक उपक्रम ठेवला तो म्हणजे जे आपल्या घरामध्ये विविध वस्तू घेऊन येत असतो आणि त्याला प्लास्टिक कव्हर असतात ते एकत्रित करून प्रत्येक शनिवारी नव कृष्णा व्हॅली स्कूल मध्ये आणून देणे,त्यानंतर महिन्यातून एक वेळेस मित्रमेळा ही संघटना तो कचरा प्लास्टिक घेऊन जाण्याचे मान्य केले व प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवण्याचा विद्यार्थी व शिक्षकेतरी व शिक्षक यांनी संकल्प केला.
शेवटी श्री. विनायक जोशी यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी संस्थेचे संस्थापक माननीय प्रवीणजी लुंकड सचिव यांची कामत यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेच्या सौ. संगीता पागनीस, डायरेक्टर सुरज फाउंडेशन व श्री अधिक पवार प्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल, सौ वंदना कुंभार, प्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल प्राथमिक विभाग श्री.प्रशांत चव्हाण, उप प्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल सौ. गीतांजली देशमुख, पाटील एच आर, सुरज फाउंडेशन राजेंद्र पाचोरे, श्रीशैल मोटगी, सौ. योगेश्री सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.