Saturday, November 23, 2024
Homeराज्यसुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे...

सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे १९ व्या सूरज फिडे रँपिड् गुणांकन बुध्दिबळ स्पर्धा – २०२२ आयोजन…

सांगली – ज्योती मोरे

सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष, क्रीडाप्रेमी आदरणीय प्रवीणशेठ लुंकड व बुध्दिबळमहर्षी भाऊसाहेब पडसलगीकर यांच्यातील क्रीडाप्रेमाची साक्ष आजही वयाच्या 67 व्या वर्षी श्री प्रवीणशेठ यांनी कायम ठेवली आहे.

गेली 18 वर्षे सुरू असलेल्या या स्पर्धा आजही मोठया प्रमाणात भरविण्याचा प्रवीणशेठ यांचा मानस आहे. सांगली हे बुध्दिबळाचे माहेरघर असल्याचे व शाळेत बुध्दिबळ ही संकल्पना राबविण्याचा आदरणीय प्रवीणशेठ व नूतन बुध्दिबळ मंडळाचे अध्यक्ष श्री. राजाभाऊ शिरगांवकर यांचा संकल्प आहे.

नूतन बुध्दिबळ मंडळ, सांगली व सूरज फाउंडेशन कुपवाड एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सूरज आंतरराष्ट्रीय फिडे रॅपिड् गुणांकन खुल्या बुध्दिबळ स्पर्धा दि. 24 ते 25 डिसेंबर 2022 रोजी कृष्णा व्हॅली बॅड्मिंटन हॅाल , एम.आय.डी.सी. कुपवाड येथे होणार आहेत.

या स्पर्धा सांगली डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशन, महाराष्ट्र चेस असोसिएशन,अखिल भारतीय बुध्दिबळ संघटना , जागतिक संघटनेच्या मान्यतेने आयोजित केल्या असून या स्पर्धेची एकूण पारितोषिके रू.2,25,000/- ( दोन लाख 25 हजारची ) आहेत. एकूण 120 पारितोषिके दिली जाणार आहेत. प्रथम पारितोषिक रू. 25000/- चे तर व्दितीय 17,000/- , 3 रे रू. 12000/- , 4 थे रू. 10,000/- , 5 वे रू. 8,000/-, 6 वे रू. 7000/-, 7 वे 6000/- ,

8 वे रू.5000/-,9 वे 4000/-,10 वे 3000/-,11 ते 20 वे रू. 2000/- , 21 ते 40 रू.1500/- त्याचबरोबर 1001 ते 1200 गुणांकन , 1201 ते 1400 गुणांकन, 1401 ते 1600 गुणांकन असणारे खेळाडू यांनी प्रत्येकी 4 पारितोषिके , 1 ले 2000/- , 2 रे 1500/- , 3 रे व 4 थे रू. 1000/- अशी असून , वयोगट 8,10,12,14,16 वयोगटासाठी प्रत्येकी 5 मुलांना तर 3 मुलीना ट्रॅाफी पारितोषिके आहेत . उत्कृष्ठ महिला खेळाडूकरीता 5 पारितोषिके 1 ले रू. 2000/- ,

2 रे रू. 1500/- , 3 रे ते 5 वे रू. 1000/- , बिगरगुणांकन खेळाडू 3 पारितोषिके 1 ले रू. 2000/- , 2 रे रू. 1500/- , 3 रे रू. 1000/- , 60 वर्षावरील ज्येष्ठ , उत्कृष्ठ सांगली जिल्हा खेळाडू 10 पारितोषिके प्रथम रू. 2000/- , व्दितीय रू. 1500/- तर 3 ते 10 वे पारितोषिके रू. 1000/-, तरूण खेळाडू रू. 1000/- शारिरीक चँलेज खेळाडू प्रथम रू. 2000/- , 2 रे रू.1500/- , उत्कृष्ठ शाळा/ कॅालेजकरीता 3 पारितोषिके प्रथम रू. 2500/- , 2 रे रू.2000/- , 3 रे रू.1500/- अशी तीन पारितोषिके दिली जाणार आहेत.
या स्पर्धेकरीता अखिल भारतीय बुध्दिबळ संघटनेचे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असते स्पर्धा फी रू. 800/- अशी आहे.

या स्पर्धेसाठी येणा-या खेळाडूंची व्यवस्था कृष्णा व्हॅली होस्टेल याठिकाणी करण्यात आली. असून त्याचठिकाणी खेळाडूंची जेवण व्यवस्था करण्यात आली आहे. या स्पर्धा आयोजनासाठी सूरज फौंडेशनचे सचिव मा. एन.जी.कामत , स्कूल कमिटीचे चेअरमन मा. यशवंत तोरो , सचिव विनायक जोशी , प्राचार्या सौ. संगिता पागनीस प्राचार्य अधिकराव पवार , एच.आर . सौ. गितांजली पाटील- देशमुख याचबरोबर नूतन बुध्दिबळ मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ शिरगांवकर, मंडळाचे सचिव चिंतामणी लिमये,

खजिनदार सौ. स्मिता केळकर, उपाध्यक्ष प्रमोद चौगुले, डॅा. उल्हास माळी, चिदंबर कोटीभास्कर, प्रा. रमेश चराटे, उदय पवार,संजय केडगे यांचबरोबर अनेक कार्यकते कार्यरत आहेत. या स्पर्धेचे पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच श्री. राजेंद्र शिदोरे ,फिडे पंच पौर्णिमा उपळावीकर- माने, शार्दुल तपासे, दिपक वायचळ काम पाहणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: