गोंदिया – राजेशकुमार तायवाडे
गोंदिया शहरासह जिल्हा विविध क्षेत्रात देशात नावलौकिक करीत आहे. त्यातल्यात्यात आरोग्य क्षेत्रातही गोंदिया जिल्हा प्रगती करीत आहे. बहुआयामी आरोग्य क्षेत्रात डॉ. पुष्पराज गिरी यांच्या नेतृत्वात सुरु होणारे हे नवे रुग्णालय महत्वाचे ठरणार आहे असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्रजी जैन यांनी केले.
आज गोंदिया शहरातील विवेकानंद कॉलोनी, हड्डीटोली येथे सुप्रीम सुपरस्पेसिलीटी हॉस्पिटलचे उदघाटन माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार विनोद अग्रवाल यांच्या शुभ हस्ते व प्रमुख अतिथी अशोक इंगळे, करण चव्हाण, नानू मुदलियार, सतीश देशमुख, घनश्याम पानतावणे, सविता मुदलियार, डॉ.ठकरानी, डॉ.पुष्पराज गिरी, डॉ.वज्रा गिरी, प्रामुख्याने उपस्थित होते.
सुप्रीम हॉस्पिटल हे रुग्णांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने आणि अत्याधुनिक सुविधा युक्त रुग्णालय असणार आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी व आरोग्य सेवेत सहानुभूतीने प्रभावी भूमिका बजावेल आणि आपत्कालीन २४ तास सेवा प्रदान करेल अशी शुभेच्छा श्री राजेंद्र जैन यांनी दिली.
यावेळी संदिप बघेले, चुन्नीलाल बेंद्रे, वसंत गिरी केवल बघेले, हर्षवर्धन भादुपोते, संजीव राय, रौनक ठाकूर सहित मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.