राज्यात आठ महिन्यापासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र आजही सर्वोच्च नायायालयाने निकाल दिलेला नसल्याने राज्यातील जनतेचा हिरेमोड झाला आहे. तर आता या प्रकरणावर येत्या मंगळवारी म्हणजे 21 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. सोबतच सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाकडून होणारी ७ सदस्यांचे घटनापीठ नेमण्याची मागणीही फेटाळली आहे.
सर्वोच्च न्यायलयाच्या घटनापीठाने राज्यातील सत्तासंघर्षाचा निर्णय राखून ठेवला असल्याने तो आता मंगळवारी लागण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट वेगळा झाला. त्यामुळे राज्यात सत्ताबदल झाला.
हे प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जावं. त्याच्या सुनावणीला वेळ लागला तरी चालेल. मात्र, शेवटी तावून सुलाखून हे प्रकरण बाहेर पडेल आणि संपूर्ण देशासमोर पारदर्शक निकाल येईल. भविष्यात कोणतंही सरकार पैसा देऊन विकत घेतलेल्या बहुमताच्या जोरावर पाडलं जाऊ शकणार नाही. असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.
तसेच शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दाही समोर आला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूने याचिका करण्यात आल्या. त्यावर जस्टिस एमआर शाह, जस्टिस कृष्ण मुरारी, हिमा कोहली आणि जस्टिस पीएस नरसिम्हा यांनी दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकली. या प्रकरणावर गेली तीन दिवस सलग सुनावणी सुरू होती,याचा निकाल आज अपेक्षित होता मात्र यावर मंगळवारी 21 तारखेला निकाल येण्याची शक्यता आहे. प्रकरण तूर्तास पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडेच आहे. हे प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जावं या शिवसेनेच्या मागणीला न्यायालयाने फेटाळून लावले आहे.