Wednesday, October 16, 2024
Homeराज्यरामटेक विधानसभा उमेदवारी मागणी करिता भाजपा पदाधिकाऱ्यांचे समर्थन...

रामटेक विधानसभा उमेदवारी मागणी करिता भाजपा पदाधिकाऱ्यांचे समर्थन…

रामटेक – राजु कापसे

डॉ राजेश ठाकरे यांच्या रामटेक विधानसभा उमेदवारीच्या समर्थनार्थ रामटेक येथील शांती मंगल कार्यालयामध्ये कार्यकर्ता मेळाव्यात तसेच चर्चा बैठक कार्यक्रमात एक मताने सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी समर्थन जाहीर केले. सदर कार्यक्रमांमध्ये विविध मान्यवरांनी आपल्या भाषणातून डॉ राजेश ठाकरे यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्व संदर्भात विविध उदाहरणात देत मान्यवरांनी आपले अनुभव व्यक्त केले.

डॉ राजेश ठाकरे. शेती विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, राज्य शासन अंतर्गत इतर सर्व प्रशासकीय कामकाज या संदर्भात त्यांचा अभ्यास असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासंदर्भात त्यांनी पीएचडी प्राप्त केलेली आहे. तसेच त्यांच्या शिक्षणाचा उपयोग शेतकऱ्यांकरिता समाजाकरिता व्हावा याकरिता सातत्याने ते राज्य व केंद्र शासनाकडे विविध पॉलिसीवर आधारित शेतकरी हितार्थ अभ्यासपूर्ण ड्राफ्ट व निवेदनात सादर केलेले आहेत, शिक्षण विभागाकरिता खाजगी शाळा कर्मचारी अधिनियम 1977 व नियमावली 1981 मध्ये कसा बदल अपेक्षित आहे या संदर्भात शिक्षणमंत्र्याकडे पॉलिसी सुद्धा सादर केलेली आहे.

डॉ राजेश ठाकरे वकील पेशाही त्यांच्याकडे असल्याने न्यायालयीन अभ्यासातून तसेच त्यांच्या प्रभावी प्रशासकीय कामकाजातून अनेक शाळांच्या पीडित शिक्षकांच्या नोकरी वाचवण्याचे कामकाज केलेले आहे. तसेच अनेक लोकांना न्यायालयात जायच्या अगोदरच त्यांना न्याय कसा मिळेल उद्योग क्षेत्रामध्ये 400 चे पेक्षा अधिक लोकांना नोकऱ्या मिळवून दिल्या. रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी भौतिक विकास ,आरोग्य ,शिक्षण तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याच्या संदर्भात सातत्याने विविध अभियातून ते मतदार संघात कामकाज करत असतात असे प्रतिपादन मान्यवरांच्या माध्यमातून करण्यात आले.

तसेच असेच उच्चविद्याविभूषित बहूयामी ओबीसी बहुजन चेहऱ्यास भाजपाच्या मध्यातून रामटेक विधानसभा करिता उमेदवारांची संधी मिळाल्यास विरोधी पक्षातला कुठलाही उमेदवार कितीही ताकतवर असेल या ठिकाणी कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचे प्रतिपादन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले..

याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित पंचायत समिती माजी सभापती श्री नरेंद्र बंधाटे , बाजार समिती माजी सभापती अनिल कोल्हे , बाजार समिती उपसभापती किशोर रांगडाले, रामटेक भाजपा मंडळ अध्यक्ष राहुल किरपाण , रामटेक युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर चंदनखेडे , रामटेक नगरपरिषद माजी उपाध्यक्ष अलोक मानकर ,कन्हान नगरपरिषद सत्ता प्रेक्ष नेता नगरसेवक राजेंद्र शेंद्रे , शहर भाजपा अध्यक्ष उमेश पटले , खंडाळा ग्रामपंचायतचे सरपंच रवींद्र केने ,

रामटेक भाजपा महिला आघाडी अध्यक्ष नेहा गावंडे ,भाजपा रामटेक तालुका महामंत्री बैजू खरे , हरीश तीवाडे,आशिष दिवटे, विश्व हिंदू परिषदेचे विनोद कोपरकर, युवा मोर्चा रामटेक तालुकाध्यक्ष धर्मेंद्र शुक्ला , युवा मोर्चा पारशिवनी तालुकाध्यक्ष वाडी भस्मे, वसंतराव जरवारकर, आशिष दिवटे, आनंदराव चोपकर, रामानंद आढामे, चंदू बस ,

करीम मलाधारी, चिंटू वाकुडकर ,सुशील ठाकरे ,संजय अजबले ,भरत चकोले आदी उपस्थित होते संचालन अनिकेत कराडे तसेच कार्यक्रमाचे यशस्वीते करिता कुंदन गिरीपुंजे, कोमल भोयर, रामदास वाघाडे, सुशील ठाकरे, राकेश चौकसे, कांतीलाल पटले, सचिन यादव, अवधेश शुक्ला सह अनेक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: