Thursday, July 18, 2024
spot_img
Homeराजकीयविकासासाठी साथ द्या खासदार प्रफुलभाई पटेल यांची कार्यकर्त्यांना साद…

विकासासाठी साथ द्या खासदार प्रफुलभाई पटेल यांची कार्यकर्त्यांना साद…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

लक्ष्मी सभागृह, भंडारा येथे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यकर्ता संवाद मेळावा माननीय खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. विकासासाठी साथ द्या अशी कार्यकर्त्यांना साद घालत खासदार प्रफुलभाई पटेल यांनी आपण या क्षेत्रातील सर्वसामान्य लोकांच्या, शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार केला आहे.

शेतकऱ्यांचा धानाला बोनस मिळावा, अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी आवश्यक पाठपुरावा केला. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल यासाठी नेहमी प्रयत्न आहे. जिल्हयातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रत्येक बूथ पातळीवर संघटन बांधणी करावी.

येणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहे. त्यासाठी महायुतीच्या 14 जानेवारी ला असलेल्या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे. असे प्रतिपादन खासदार प्रफुलभाई पटेल यांनी केले.

या संवाद मेळाव्याला खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या सोबत माजी राजेंद्र जैन, नाना पंचबुद्धे, मधुकर कुकडे, जयंत वैरागडे, सुनील फुंडे, नरेश माहेश्वरी, धनंजय दलाल, अविनाश ब्राह्मणकर, यशवंत सोनकुसरे, विजय सावरबांधे, लोमेश वैद्य, देवचंद ठाकरे, हेमकृष्ण वाडीभस्मे, धनु व्यास, वासुदेव बांते, विठ्ठल रहमतकर, नंदू झंझाड, सदाशिव ढेंगे,

नागेश पाटील वाघांये, बालू चून्ने, अंगराज समरीत, धनेंद्र तुरकर, रितेश वासनिक, योगेश सिंघनजुडे, मोहन राऊत, रिनाताई हलमारे, सरोज भुरे, नेहा शेंडे, लक्ष्मीताई सावरकर, योगेश धनुस्कर, देवेंद्रनाथ चौबे, सचिन बावनकर, सुरेश रहांगडाले, राजकुमार माटे, इद्रिसभाई लधाणी, किशोर लांजेवार, राजेश वासनिक, शैलेश मयूर, के.के.पंचबुद्धे,

नारायण सिंग राजपूत, स्वप्नील नशीने, राहुल निर्वाण, बाळा गभणे, सुनील सावरकर, रत्नमाला चेटुले, आरजू मेश्राम, चेतक डोंगरे, रुपेश टांगले, हिरालाल खोब्रागडे, त्रिवेणी पोहरकर, हेमंत महाकाळकर, नूतन कुर्झेकर, संजना वरखडे, राजू हाजी सलाम, गणेश चौधरी, विजय खेडीकर, मंजुषा बुराडे, पमाताई ठाकूर, गणेश चौधरी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश”

या संवाद मेळावा प्रसंगी खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोहाडी व तुमसर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यात आष्टी जि. प. क्षेत्रातील सुमित गौपाले सरपंच, नाकाडोंगरी, सियाराम नागपुरे, चंद्रपाल गौपाले, सचिदानंद गौपाले, जितेंद्र नागपुरे, आनंदराव चौधरी, सुनील नेवारे, राखीचंद नागपुरे,

राजकुमार नागपुरे, निकेश करकाडे, प्रकाश मेश्राम, डोंगरगाव जि. प. क्षेत्रातील रामदयाल बिसेन, बारकू झंझाड, बंडूभाऊ टेभरें, विनोद शरणागत, राजेंद्र चौहान, विशाल लांडगे यांच्या सह अनेकांचा पक्षाचा दुपट्टा वापरून प्रवेश केला.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: