नागपूर – शरद नागदेवे
पारशिवनी- मा.उपविभागीय पो. अधिकारी रामटेक यांच्या अध्यक्षतेखाली मा. थोरात सर पोलिस निरीक्षक यांच्या उपस्थितीत पो.स्टेशन पारशीवनी ठाण्यात एक सभा घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पारशिवणी तर्फे पारशिवणी पोलीस स्टेशनला अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष सुरू करणेबाबत निवेदन देण्यात आले.कार्याध्यक्ष मा.मोहनजी लोहकरे डॉ .इरफान सर जेष्ठ पत्रकार मा. गोपाल जी कडु ,कापसे सर ,पनवेलकर जी पुनाराम गजभिये,अडकणे जी पोलिस पाटील व संघटक गजभिये मँडम आणि पारशिवनी येथील जेष्ठ नागरिक विचारवंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा.थोरात सरांनी सांगितले की येत्या दोन दिवसात अंधश्रद्धा निर्मुलन कक्ष उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.अंधश्रद्धेवर मा.थोरात सरांनी मार्गदर्शन केले आणि मा.थोरात सरांशी पहिल्यांदाच भेट झाल्यामुळे मी लिखित दोन पुस्तकी व पुष्पगुच्छ देऊन सरांचे आभार व्यक्त केले.मी रामदास सोमकूंवर अध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पारशिवनी च्या वतीने सर्वमान्यवरांनी या कामी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभार रामदासजी सोमकुवर अध्यक्ष महा.अनिस शाखा पारशिवणी यांनी केले .