डॉ. राजेश ठाकरे यांच्या हस्ते शिबिराच्या शुभारंभ…
रामटेक – राजु कापसे
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर जिल्हाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर रामटेक येथील बाल उद्यान सभागृहात आयोजित करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हा समन्वयक डॉ राजेश ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना माल्ल्याअर्पण करून मार्गदर्शन कार्यक्रमाच्या शुभारंभ झाला याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मार्गदर्शकाच्या माध्यमातून प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते.
या प्रशिक्षण शिबिरात शेकडो लोकांनी सहभाग घेतलेला होता मार्गदर्शक म्हणून डॉक्टर ओमप्रकाश आष्टानकर तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी व्यासपीठावर होते सदर कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता कार्यक्रमाच्या आयोजनात चंद्रशेखर भोयर, नाना उराडे ,कांचनमला माकडे तथा अंधश्रद्धा निर्मूलन समिती रामटेक तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघ रामटेक यांच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले