Friday, November 22, 2024
Homeराज्यरामनगरीतील अलौकीक शोभायात्रा सोहळ्याने वेधले लक्ष - विविध झाकींसह स्वागतद्वार सजावटदारांना बक्षीसे...

रामनगरीतील अलौकीक शोभायात्रा सोहळ्याने वेधले लक्ष – विविध झाकींसह स्वागतद्वार सजावटदारांना बक्षीसे…

अलौकीक सोहळा पहाण्यासाठी नागरीकांची हजेरी

रामटेक – राजु कापसे

रामटेक :- कार्तिक पोर्णिमेदरम्यान प्रख्यात रामनगरीत निघणारी शोभायात्रा ही दुरवर चर्चीत आहे. येथील अलौकीक सोहळा पहाण्यासाठी येथे दुरवरून तथा लगतच्या गावांतुन नागरीक येत असतात. एवढेच नाही तर लग्न करून परगावी गेलेल्या मुली सुद्धा माहेरी याच दिवसांमध्ये रामटेकला येत असतात.

यावर्षीची ही ४२ वी शोभायात्रा आयोजीत करण्यात आलेली होती. २५ नोव्हेंबर ला सायं.५ वाजता प्रख्यात अठराभुजा गणपती मंदीर येथुन पुजा करून शोभायात्रेने प्रस्थान केले. दरम्यान यावेळी संत तुकाराम महाराज, भारतीय जनसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे,सचिव तथा माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, शोभायात्रा समितीते अध्यक्ष ऋषीकेश किंमतकर,

उपविभागीय अधिकारी ( महसुल ) वंदना सवरंगपते, तहसीलदार हंसा मोहने, मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांचेसह भारतीय जनसेवा मंडळाचे सदस्य उपस्थित होते. दरम्यान शोभायात्रेचे संस्थापक स्वर्गीय गोपालबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यानंतर झाक्यांची उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते पुजा करण्यात आली.

त्याचप्रमाणे स्वागतद्वार सुद्धा लावण्यात आलेले होते. या सोहळ्याचे समापन नेहरु मैदान येथे करण्यात येणार आले. शोभायात्रेतील प्रथम पुरस्कार महाकाल तथा महाकाली तांडव नृत्य भगतसिंग वार्ड व राजाजी वार्ड रामटेक आणि द्वितीय पुरस्कार द्रोपदी वस्त्र हरण रामाळेश्वर वार्ड रामटेक व इतर झाक्याला मुख्य आर्कषक राकेश बेदी व इतर मान्यवराच्या हस्ते बक्षीस वितरीत करण्यात येणार आहे.

शोभायात्रा सोहळ्याच्या यशश्वीतेकरीता शंकरराव चामलाटे, नत्थू घरझाडे, पि.टी रघुवंशी, चंद्रकांत ठक्कर, विनायक डांगरे, अशोक पटेल, निलेश पटेल, बालचंद खोडे, सुभाष बघेले, गोपी कोल्हेपरा, ज्योती कोल्हेपरा, राजेश किंमतकर, गजु बिसने, स्वप्निल लेंडे, चेतन चोपकर,धर्मेश भागलकर, राजु कापसे, प्रविन गिरडकर, संजय बिसेन, सुनिल मुलमुले,

संजय मुलमुले, दिपक टुले, भुषन नानोटे, विशाल भोगे, युगल भोगे, दिनेश बिसने, निर्मल बिसन, अविनाश बिसने, पारस आंबाडारे, अमेय दिघे, अक्षय भोगे, सचिन चौरसिया, बादल कुंभलकर, अजय मेहरकुडे, भाऊ राहाटे, नरेश माकडे आदींनी मोलाचे सहकार्य केले. उपविभागिय पोलीस अधिकारी आशित कांबळे, पोलीस निरीक्षक ह्रदयनारायन यादव यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त करण्यात आला.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: