नांदेड – महेंद्र गायकवाड
एका स्त्री जातींचे बालक अनधिकृतपणे विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवल्या प्रकरणी सिडको क्रांतीचौक येथील एका शिशुगृहाच्या अधीक्षकाला दहा वर्षाच्या सक्षम करावासाची शिक्षा व एक लाखाचा रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.बांगर यांनी सुनावली आहे.
शहरातील सिडको भागातील क्रांती चौक येथील एका शिशुगृहात दहा बालके ठेवण्याची परवानगी असताना या शिशुगृहाचे अधीक्षक नागेश गुट्टे यांनी दहा बालका व्यतिरिक्त एका स्त्री जातींचे बालक अनधिकृतपणे विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवले होते.
ही घटना दि.20 एप्रिल 2016 रोजी 11 वा चे सुमाराम तपासणीत उघड झाली. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गु. र.नं. 139/2016 नूसार नागेश विठ्ठल गुट्टे वय 27, अधीक्षक यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. सत्र खटला क्र.37/2017 नूसार जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. बांगर यांच्या पुढे चालला.
साक्षी, पुराव्याअंती आरोपी अधिक्षक नागेश विठ्ठल गुट्टे यास कलम 370 (1) ( ई) मध्ये दहा वर्ष सश्रम कारावास व एक लाख रूपये दंड आणि कलम 33,34 बालकांची काळजी व संरक्षण मध्ये 6 महिने शिक्षा दहा हजार रूपये दंड अशी शिक्षा न्या. बांगर यांनी सुनावली आहे.
या प्रकरणाचा तपास पोउपनि पी.केमराडे व रायटर पोकॉ. मुसळे यांनी केला. पोलिस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून पोहेकॉ चंद्रकांत ए.पांचाळ व तत्कालीन पोहेकॉ सिदीकी यांनी काम पाहिले. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील रणजित देशमुख व सहायक सहकारी अभियोक्ता मोहम्मद अब्बास यांनी काम पाहिले.