मुर्तिजापूर :- शहरात चोरटयांनी विविध ठिकाणी चोरी व लुटमार करुण अक्षरशः शहरातली व्यावसायिक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने येथिल सर्वसामान्य नागरिक व व्यापारी वर्ग दहशतीत असल्याने आज जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांनी शहरात चोरी व लुटमार झालेल्या ठिकाणी आपल्या तफ्यासाह, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे,शहर पोलिस स्टेशन चे प्रभारी निरीक्षक अनंत वडतकर,ग्रामीण पोलीस स्टेशन चे निरीक्षक कैलास भगत, पी एस आय सूर्यवंशी यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी करून व्यावसायिकांना दिलासा देत सदर घटनेतील अरोपी लवकरच पोलीसांच्या जाळ्यात अडकणार असल्याचे माहिती दिली.
जिल्हा पोलिस अधीक्षक यांना गुप्ता वाईन शॉप येथे आकस्मिक भेट देऊन पाहणी केली व राजेश गुप्ता यांच्या कडून घडलेल्या प्रकार समजून घेऊन त्याच्या जवळील रोख रक्कम घेऊन पसार झालेल्या घटनेची सविस्तर माहिती घेतली तसेच येथिल जागृत देवरण मारूती देवस्थान चे हनुमानाच्या चांदीचे मुकूट लंपास झालेल्या घटना स्थळी भेट देवून संस्थेचे अध्यक्ष दर्शन उपाध्ये व शहर पोलिस स्टेशन सामोर असलेल्या ठाकूर बोअरवेल व हार्डवेर च्या दुकानाचे शटर तोडून रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली त्या ठिकाणी भेट देवून प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेत व्यावसायिकांना दिलासा दिला.
मात्र जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मूर्तिजापूर दौऱ्याच्याच दिवशीही मुर्तीजापुर शहरातील बस स्थानाकात एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे हार चोरट्यांनी लंपास केल्याने पोलीस यंत्रनेच्या कार्यावर मोठे प्रश्न उभे राहत असून शहरात विविध चर्चेला उधाण आले आहे.
” शहरात घडलेल्या घटनेचा लवकरच छडा लावून आरोपी गजाआड करण्यात येईल. तसेच नागरिकांना व व्यवसायिकांना घाबरण्याची गरज नसून रात्रीच्या वेळी अधिक पोलीसांची पेट्रोलिंग वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहे”.
बच्चनसिंह. जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला.