Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीमिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाणे हद्दीतील गौस उर्फ निहाल गब्बार मोमीन टोळीवर...

मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाणे हद्दीतील गौस उर्फ निहाल गब्बार मोमीन टोळीवर मोका अंतर्गत कारवाई, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांची माहिती…

सांगली – ज्योती मोरे.

मिरज मधील महात्मा गांधी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गौस उर्फ निहाल गब्बार मोमीन या टोळीवर पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौस उर्फ निहाल गब्बार मोमीन वय-28 वर्षे ,राहणार-धनगर गल्ली, बुधवार पेठ, मिरज. सध्या राहणार- सुभाष नगर, मिरज. यानं समर्थ संजय गायकवाड वय-18, राहणार-हडको कॉलनी, शंभर फुटी रोड,मिरज. जावेद बंडूखान शेख वय-२७, धंदा-मजुरी,राहणार -झारी मज्जिदी मागे मिरज.तसेच कुणाल दिनकर वाली.

राहणार- म्हाडा कॉलनी,मिरज.या सध्या फरार असलेल्या साथीदारासह सन 2018 पासून ते आज अखेर सतत गुन्ह्यांची मालिकाच केली आहे. या टोळी विरुद्ध घातक हत्याराने जबर दुखापत करून जबरी चोरी करणे, दहशत निर्माण करून खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा घालणे,बनावट नोटा जवळ बाळगून त्याची विक्री करणे, अग्निशस्त्र जवळ बाळगणे,

जबरी दुखापतीची भीती घालून बेकायदेशीर जमाव जमवून निष्पाप लोकांना मारहाण करणे,शिवीगाळ दमदाटी करून नुकसान करणे,विनयभंग करणे,इत्यादी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेत. शिवाय ही टोळी आर्थिक फायद्याचे जोरावर परिसरात वर्चस्व प्रस्थापित करत असून आजूबाजूच्या परिसरात दहशत निर्माण केल्याने सदर टोळीवर मोका अंतर्गत कारवाई केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: