अमरावतीचे खासदार बळवंत भाऊ वानखडे यांचा गड व अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला विधानसभा मतदार संघात काँग्रेस कडून अनेकांनी आपली दावेदारी दाखल केली आहे. मात्र भाजपकडून दोन-तीन लोकांनीच दावेदारी दाखल असल्याचे समजते. तर काही बाहेरच्या जिल्ह्यातील सुद्धा या मतदार संघात नशीब आजमावण्यासाठी मतदार संघात भेटी घेत आहेत. या मतदार संघात इच्छुक उमेदवार मागील निवडणुकीत पराभूत झालेले रमेश बुंदिले व त्यांची पत्नी यांचे नाव समोर येत आहे.
अश्यातच ॲड. सुनित घोडेस्वार यांना सुद्धा भाजप संधी देवू शकते. घोडेस्वार यांनी 2014 मध्ये मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात आपली दावेदारी दाखल केली होती. त्यानंतर त्यांनी 2019 च्या निवडणुकीच्या वेळेस दर्यापूर विधानसभेसाठी सुद्धा त्यांनी मोठी तयारी केली होती. आता यावेळी सुद्धा या मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. व्यवसायाने वकील असलेले सुनीत घोडेस्वार हे अत्यंत संयमी शांत स्वभावाचे असून त्यानी भा ज पा पक्षात जिल्हा सचिव तसेच त्यानंतर त्यानी संघाच्या भारतीय विचार मंच व त्यानंतर आता अधिवक्ता परिषद मध्ये विदर्भ प्रांत मंत्री म्हणून काम करत आहेत.
नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजपचा झालेला दारुण पराभव लक्षात घेता यावेळी भाजपने नवीन चेहरा म्हणून उमेदवार देणार असल्याचे समजते. तर दर्यापूर मतदारसंघात यापूर्वीही सुनित घोडेस्वार यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. तर सुनित घोडेस्वार यांना उमेदवारी मिळाली तर दर्यापूर विधानसभा मतदारसंघात एक स्वच्छ प्रतिमेचा व्यक्ती सुशिक्षित उमेदवार भाजपा ला मिळू शकतो.
2019 च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची युती असून सुद्धा भाजपचा उमेदवाराचा पराभव झाला होता मात्र यावेळी भाजपकडे त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी चांगल्या व्यक्तीची निवड केल्यावरच या मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून येऊ शकतो तर बुंदीले यांच्यावर मतदारसंघात नाराजीचे सूर होते. त्यामुळेच भाजपला येथे फटका बसला मात्र यावेळी भाजपकडे चांगली संधी आहे तर भाजप जिल्ह्यातीलच सुशिक्षित चेहरा देणार असल्याचे समजते तर हा चेहरा ॲड. सुनित घोडेस्वार सुद्धा असू शकतो…