अमरावती – महावितरण अमरावती जिल्ह्याच्या अधिक्षक अभियंता पदाचा पदभार सुनिल शिंदे यांनी स्विकारला आहे.यापूर्वी ते कार्यकारी अभियंता म्हणून कोल्हापूर येथे कार्यरत होते.अधिक्षक अभियंता दिलीप खानंदे यांची पालघर येथे बदली झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.
अभियांत्रिकी पदवी प्राप्त केल्यानंतर कनिष्ठ अभियंता म्हणून तत्कालीन महामंडळात ४०० केव्ही उपकेंद्र भुसावळ येथे १९९१ मध्ये रूजू झाल्यानंतर सुनिल शिंदे यांनी आपल्या ३२ वर्षाच्या सेवेत पदोन्नतीवर उपकार्यकारी अभियंता पाटण(सातारा),कार्यकारी अभियंता भोसरी, कार्यकारी अभियंता कोल्हापूर या ठिकाणी काम केल्याचा अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. शिवाय कोल्हापूरला आपात्कालीन परिस्थितीत काम करण्याचा अनुभवाचा फायदाही जिल्ह्यातील ग्राहकांना होणार आहे.
मुळचे कराड (सातारा जिल्हा) येथील रहीवासी असलेले सुनिल शिंदे यांची महावितरण अमरावती जिल्ह्याच्या अधीक्षक अभियंता म्हणून पदोन्नतीवर बदली झाली आहे. वीज सेवा अत्यावश्यक सेवा असल्याने ग्राहक सेवेला प्राधान्य राहणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगीतले.