Monday, December 23, 2024
HomeमनोरंजनWelcome 3 मध्ये सुनील शेट्टीची एन्ट्री...आणखी कोणते कलाकार असणार?...जाणून घ्या...

Welcome 3 मध्ये सुनील शेट्टीची एन्ट्री…आणखी कोणते कलाकार असणार?…जाणून घ्या…

Welcome 3 – ‘वेलकम 3’ या चित्रपटाची प्रेक्षकांना खूप आतुरता आहे. आता या चित्रपटाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, संजय दत्त आणि अर्शद वारसी दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता आणखी एक स्टार या फ्रँचायझीमध्ये सामील झाल्याची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात सुनील शेट्टीचीही एन्ट्री झाली आहे.

‘वेलकम 3’मध्ये सुनील शेट्टी दमदार आणि महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे. सुनील शेट्टीचे फिरोज नाडियादवाला आणि अक्षय कुमारसोबत खूप चांगले बाँडिंग आहे. ‘वेलकम 3’मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यावर त्याने लगेच होकार दिला. याबाबत सुनील शेट्टी चांगलाच उत्सुक आहे. या फ्रँचायझीमध्ये यापूर्वी कधीही न पाहिलेली भूमिका तो या चित्रपटात साकारणार आहे.

सुनील शेट्टी एका कॉमिक भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे. त्याची व्यक्तिरेखा एका नव्या शेडची असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘वेलकम 3’चे प्री-प्रॉडक्शन काम सुरू झाले आहे. टीमने या चित्रपटाचे शूटिंग लोकेशनही फायनल केले असून लवकरच शूटिंग सुरू होणार आहे. टीम सध्या एक्शन सीन आणि कॅरेक्टरच्या लूकवर काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

या फ्रँचायझीच्या पहिल्या चित्रपटात म्हणजेच ‘वेलकम’मध्ये सुनील शेट्टीही खास भूमिकेत दिसला होता. ‘वेलकम 3’ बद्दल बोलायचे झाले तर त्याचे दिग्दर्शन अहमद खान करणार आहे. हा एक साहसी कॉमेडी चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. ‘वेलकम टू द जंगल’ असे या चित्रपटाचे शीर्षक आहे. पुढील वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: