Monday, December 23, 2024
Homeराज्यरामधाम येथील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात सुनील केदारांचे उद्गार...

रामधाम येथील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात सुनील केदारांचे उद्गार…

रामधाम येथील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात सुनील केदारांचे उद्गार…

  • रामधाम येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

माजी राज्यमंत्री सुनील केदार, नवनियुक्त खासदार शाम बर्वे, रश्मी बर्वे यांची उपस्थिती

रामटेक – राजु कापसे

तिर्थक्षेत्र रामधाम मनसर येथील मॉ गायत्री सभागृहात श्री चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठाण आणि रामटेक विधानसभा पत्रकार संघाच्या सयुक्त विद्यमाने इयता १० वी व १२ वी च्या प्राविण्य प्राप्त गु़णवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आज दि. ९ जुन ला पार पडला. सकाळी ११ दरम्यान प्रारंभ झालेला हा सत्कार सोहळा दुपारच्या सुमारास पार पडला. उष्णतेच्या तप्त वातावरणातही विद्यार्थी व पालकांनी या सोहळ्याला आवर्जुन हजेरी लावली होती हे येथे विशेष.

आज रविवार (दि.०९) जुन ला सकाळी ११ वाजता मॉ पार्वती सभागृह रामधाम तिर्थक्षेत्र मनसर येथे श्री चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठाण आणि रामटेक विधान सभा पत्रकार संघाच्या सयुक्त विद्यमाने इयता १० वी व १२ वी मध्ये प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा माजी मंत्री सुनिल बाबु केदार, आदीवासी विकास उपायुक्त रविंद्र ठाकरे, रामटेक खासदार मा. श्यामकुमार बर्वे, पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे, मा. सुनिल रावत, कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक चे सभापती सचिन किरपान, पत्रकार मालविये सर,

माजी जि प अध्यक्षा रश्मीताई बर्वे, संध्याताई चौकसे आदी मान्यवरांच्या हस्ते श्री राम जानकी च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. रॉईट टर्न चे डॉ आशिष तायवाडे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकाना मुलांच्या पुढील उज्वल भविष्या विषयी अप्रतिम सखोल असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी नविन पिढी आमच्या ही कितीतरी पुढे असल्याने शिक्षणा शिवाय तरणोपाय नाही.

यास्तव ग्रामिण खेडा पासुनच सर्व स्तरावर विद्यार्थ्या चांगल्या दर्जाच्या शासनाच्या शाळा, महा विद्यालयातुन सर्वाना समान शिक्षण मिळालेच पाहिजे . आणि तो त्यांचा मुलभुत अधिकार असताना त्याची अमलबजावणी झाली तरच देशाचे भविष्य सु़ध्दा उज्वल होईल. असे प्रतिपादन विदर्भाचे झुजांर लोक नेते मा. सुनिल बाबु केदार हयानी केले.

तदंनतर पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे, उपायुक्त मा. रविद्रजी ठाकरे, माजी मंत्री सुनिल केदार, खासदार श्यामकुमार बर्वे आदी मान्यवरानी मार्गदर्शन करून इयता १० वी मध्ये ९० % पेक्षा जास्त गुण प्राप्त २६ विद्यार्थ्याचा सत्कार करून विचार पिठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इयता १० वीच्या रामटेक, देवलापार, पारशिवनी, कन्हान, मौदा येथील ५६ शाळे तील १७६ विद्यार्था चा तसेस इयता १२ वी च्या १५ कनिष्ट महाविद्यालयातील ७५ विद्यार्थी असे एकुण २५१ विद्यार्थ्यांचा भव्य सत्का र करून पुढील उज्वल भविष्याचा आर्शिवाद देऊन शुभेच्या देण्यात आल्या.

प्रास्ताविक गोपाल कडू यांनी तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आदर्श शिक्षक खुशाल कापसे हयानी तर ग्रामिण पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम रहाटे यानी आभार व्यक्त केले. कार्यक्रमास रामटेक विधान सभेतील बहुसंख्य मुख्याध्यापक, पत्रकार, शिक्षक व पालक प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वानी स्नेह भोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्री चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठाण मनसर आणि रामटेक विधानसभा पत्रकार संघ पदाधिकारी, सदस्यानी सहकार्य केले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: