सांगली – ज्योती मोरे.
सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, ठाणे जिल्ह्यातील 110 विद्यार्थ्यांनी शिबिरामध्ये सहभाग घेतला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली,मिरज व कुपवाड महानगरपालिकेचे महापौर मा. दिग्विजय सूर्यवंशी साहेब, नगरसेवक मा. विष्णू माने साहेब, मा नगरसेवक मा. मुन्ना कुरणे साहेब, योगाचार्य मा. एम.जी. पाटील, पैलवान समशेर कुरणे,
पैलवान युवराज पाटील,पैलवान नारायण सालगुडे पाटील,पैलवान गौतम मोरे,मा.गिरीश मोहिते, मा. संजय माने,मा.मारुती पाटील,पैलवान बसवराज बिराजदार,मा.शिवाजी जाधव,मा.सतीश माने, मा. आनंदा गोयकर, मा.सलीम शेख,मा.अमर भोसले, मा.गणेश गोसावी, मा.अमित पाटील,
मा. अमित कांबळे तसेच वसंतदादा कुस्ती केंद्रा चे चेअरमन मा आशिष बर्गे, सचिव राहुल नलवडे, व्यवस्थापक रुपनर आण्णा, कुस्ती कोच आप्पा चंदनशिवे, कुस्ती कोच सचिन जाधव, प्रशिक्षक पैलवान ऋषिकेश देवकते, पैलवान पवन माने,पैलवान दिगंबर राजमाने, पैलवान निलेश पाटील त्याचप्रमाणे शिबिरातील युवा मल्लांचे पालक व वसंतदादा कुस्ती केंद्रातील पैलवान उपस्थित होते.
महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचा सत्कार सचिव राहुल नलवडे व अध्यक्ष आशिष बर्गे यांनी केला, मा नगरसेवक मुन्ना कुरणे यांचा सत्कार आशिष बर्गे व अमित पाटील यांनी केला, नगरसेवक विष्णू माने यांचा सत्कार कुस्ती कोच आप्पा चंदनशिवे व व्यवस्थापक रुपनर आण्णा यांनी केला, योगाचार्य पाटील साहेब यांचा सत्कार पैलवान युवराज पाटील यांनी केला.
गेले 27 वर्षे होणाऱ्या शिबिरातील नवोदित मल्लांना पोषक आहार करून देणाऱ्या श्रीमती संगीता वहिनी व मंगल वहिनी यांचा सत्कार महापौर दिग्विजय सूर्यवंशी व मुन्नासाहेब कुरणे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच कुस्ती प्रशिक्षक यांचा ही सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक सचिव राहुल चंदनशिवे यांनी मानले.