Monday, December 23, 2024
HomeBreaking Newsअकोल्यात पोलीस कर्मचारी वृषाली स्वर्गे हिची आत्महत्या!...पोलीस दलात खळबळ...

अकोल्यात पोलीस कर्मचारी वृषाली स्वर्गे हिची आत्महत्या!…पोलीस दलात खळबळ…

न्यूज डेस्क- अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या वृषाली दादाराव स्वर्गे (वय ३५) हिने जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गीता नगरमध्ये एका अपार्टमेंटमध्ये त्यांच्या राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना आज सकाळी उघडीस आली. तिच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटसुधा आढळून आली. घटनास्थळी जुने शहर पोलीस अधिक तपास करीत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, वृषाली दादाराव स्वर्गे हिच्या पतीचे निधन झाले, त्यात मुलं-बाळ नव्हतं, आयुष्यात एकटीच राहिली, या आयुष्याला पूर्णपणे वैतागली, म्हणून आज ‘मी’ आपलं जीवन इथेचं संपवत आहे, अशाप्रकारे सुसाईड नोट लिहून वृषाली हिने आत्महत्या केली आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक नितिन लेव्हरकर यांनी दिली आहे.

वृषाली हिची काही दिवसांपूर्वी त्यांची बदली झाली होती, त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना विनंती करून बदली थांबवण्यात यावी, असा आग्रह केला. त्यानंतर वृषाली यांना कोतवाली पोलीस ठाण्यात कायम ठेवण्यात आलं. पोलीस दलात ड्युटीवर असताना सर्व काही सुरळीत सुरू होतं. काल १५ ऑगस्ट रोजी झेंडावंदन करण्यासाठी पोलीस ठाण्यात ते गैरहजर होते. दरम्यान वृषाली जिथे राहायचे तिथे शेजारील लोकांना त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागली. शेजाऱ्यांनी अनेकदा दरवाजाही ठोकला, परंतु आत मधून कुठल्याही प्रतिसाद येत नव्हता. त्यानंतर याची माहिती जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली. पोलिसांनी आज पहाटे घटनास्थळ गाठून वृषाली यांच्या घराचा दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला. यावेळी वृषाली ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात श्रवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. तसेच या प्रकरणात आकस्मित मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहे.

वृषाली यांचे पती दादाराव स्वर्गे हे पोलीस दलात कार्यरत होते. सुमारे सन २०१४ मध्ये दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले, त्यानंतर त्यांच्या जागी वृषाली या पोलीस दलात दाखल झाल्या. दरम्यान २०१४ पासून वृषाली एकटीच राहायची, लग्नानंतर त्यांना कोणतेही मुलबाळ नव्हतं, त्यात पतीचे निधन झाले. तेव्हापासून त्या नेहमी तणावात राहायच्या अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान वृषाली यांच्याजवळ एक सुसाईड नोट आढळून आली, त्यामध्ये तिने म्हटले आहे की पतीच्या निधनानंतर आयुष्यात आज एकटी राहिली आहे. त्यात मूल-बाळ पण नाहीये, जगावं तर कोणासाठी? त्यामुळे आज माझ्या इच्छेने ‘मी’ आपलं जीवन संपवत आहे, माझ्या मृत्यूला कोणालाही कारणीभूत म्हणजे जबाबदार ठेवू नका, हे सर्व काही स्वता करीत आहे, असं सुसाईड नोटमध्ये नमूद आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: