सांगली – ज्योती मोरे.
ऊस तोडणी मुकादमा कडून दरवर्षी होणारी कोट्यावधीची फसवणूक त्यातून देशोधडीला लागणारे ऊस वाहतूकदार, त्यांच्या वाढलेल्या आत्महत्या,हे सूत्र थांबलं पाहिजे. यासाठी ऊस तोडणी टोळी करार स्वर्गीय गोपीनाथ मुंडे महामंडळाच्या माध्यमातून आणि केंद्रीकरण पद्धतीनेच झाली पाहिजे.
या मुख्य मागणीसाठी आज सांगलीतील तरुण भारत स्टेडियमवर ऊस वाहतूकदार संघटनेचे नेते पैलवान पृथ्वीराज पवार,अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, निमंत्रक संदीप राजोबा यांच्या प्रमुख उपस्थितीत ऊस वाहतूकदारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्यास विश्रामबाग मधील क्रांतीसिंह नाना पाटील पुतळ्यापासून ट्रॅक्टर रॅली काढून सुरुवात करण्यात आले.