Sunday, December 22, 2024
Homeराज्यऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी साखर कारखाना ठरणार वरदान – खासदार प्रफुलभाई पटेल…

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी साखर कारखाना ठरणार वरदान – खासदार प्रफुलभाई पटेल…

नॅचरल ग्रोवर्स साखर कारखाना गाळप हंगामाचे खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या शुभहस्ते शुभारंभ…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

शुभारंभ प्रसंगी खासदार प्रफुलभाई पटेल म्हणाले की, परिस्थितीनुरूप हा कारखाना बंद पडला होता पण या वैनगंगा व चुलबंद नदीच्या खोऱ्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी व लोकोपयोगी कामांसाठी पुन्हा साखर कारखाना सुरु करण्यात आला आहे.

निश्चितच लाखांदूर, पवनी, अर्जुनी मोर, साकोली, लाखनी, सडक अर्जुनी, देसाईगंज व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी वरदान ठरणार आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना अन्य पिकांच्या उत्पादनाचा पर्याय मिळावा व शेतीवर आधारित अन्य उदयोग यावेत याच उद्देशाने कारखाना सुरु करण्यास प्रयत्न असे प्रतिपादन पटेल यांनी केले.

आज लाखांदूर जि. भंडारा येथील नॅचरल ग्रोवर्स साखर कारखान्याच्या पहिले गाळप हंगामाचे शुभारंभ, गव्हाण व मोळी पूजन कार्यक्रम खासदार प्रफुल पटेल यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

खासदार पटेल पुढे म्हणाले की, कामांसाठी कोणतीही बोंबाबोंब न करता विकास कार्य करण्यावर विश्वास ठेवतो. शेतकरी व शेतमजुर व बेरोजगारांचे हितासाठी नेहमी प्रयत्न केले आहेत. सध्या साखर कारखान्याची क्षमता ८०० मेट्रिक टन असून पुढे कारखान्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे. या कारखान्यामुळे परिसरातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार असून प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष पणे शेतमजूर व बेरोजगार युवकांना रोजगार मिळणार आहे.

या शुभारंभ प्रसंगी खासदार प्रफुल पटेल यांच्या सोबत माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, नाना पंचबुद्धे, गंगाधर परशुरामकर, बाबा गुजर, सुनील फुंडे, धनंजय दलाल, यशवंत गणवीर, विनोद ठाकरे, अविनाश ब्राह्मणकर, संजय गुजर, सत्यजित गुजर, विजय सावरबांधे, बालू चुन्ने, लोकपाल गहाने, संजना वरखडे, निमा ठाकरे, कल्पना जाधव, डॉ .अविनाश काशीवार, लोमेश वैद्य, हरीश तलमले, अड मोहन राऊत, धनु व्यास, नागेश पाटील, देविदास राऊत, दानेश साखरे, नरेंद्र चौधरी, बबन पिलारे, राकेश राऊत, उमेश राऊत, सचिन बरंय सहित मोठ्या संख्येने शेतकरी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: