अमरावती – शेतकरी हा जगाचा पोशिंदा असला तरी राज्यातील महायुतीच्या सरकारने या पोशींद्यालाच संपविण्याचा घाट घातला आहे. सरकारच्या या प्रयत्नांचा राष्ट्रवादी कृषी पदवीधर संघटना जोरकसपणे मुकाबला करुन राज्यातील शेतकर्यांच्या व कृषी पदवीधरांच्या न्याय्य हक्कासाठी भक्कमपणे त्यांच्या पाठीशी ऊभी राहणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कृषी पदवीधर संघटनेचे राज्यप्रमुख सुधीर राऊत यांनी केले.
राष्ट्रवादी कृषी पदवीधर संघटनेच्या राज्यप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच अमरावती जिल्ह्याच्या दौर्यावर आलेल्या सुधीर राऊत यांनी पत्रपरीषदेला संबोधित करतांना ऊपरोक्त आशयाचे प्रतिपादन केले. राज्यातील कृषी पदविधरांसहीत सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर ऊतरून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न राष्ट्रवादी कृषी पदवीधर संघटनेचा असेल असे यावेळी सुधीर राऊत यांनी सांगीतले.
यावेळी पत्रकार परिषदेला जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप राऊत, शहर अध्यक्ष हेमंत देशमुख, राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे प्रदेश ऊपाध्यक्ष गणेश रॅाय, प्रदेश प्रवक्त्या तेजस्वीनी बारब्दे, राष्ट्रवादी सेवादलाचे जिल्हाध्यक्ष कीशोर बरडे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनील कीर्तकार, रायुकाॅचे शहर अध्यक्ष रोशन कडू, क्रुषीतज्ञ प्रा.अनिल बंड, विनेश आडतिया, मनोज अर्मळ, ॲड.संजय भोंडे, रवि पडोळे, बाळासाहेब चर्हाटे, अक्षय ढोले, अविनाश ठाकरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.